Home गाजावाजा स्पेशल लिथियमच्या साठा ठरणार भारतासाठी गेमचेंजर
गाजावाजा स्पेशल

लिथियमच्या साठा ठरणार भारतासाठी गेमचेंजर

10
Lithium
Lithium reserves will be a game changer for India marathi info

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाला 5.9 दशलक्ष टन लिथियमचे (Lithium) स्त्रोत सापडले आहेत. आतापर्यंत लिथियमसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही गेमचेंजर अशी बातमी ठरणार आहे.  इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात महत्त्वाचे मानले जाणारे लिथियम आतापर्यत भारतात आयात करावे लागत होते. त्यासाठी चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांवर भारताला अवलंबून रहावे लागत होते.  मात्र भारताला मिळालेला लिथियमचा (Lithium) नवा खजिना भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या वाटेतील महत्त्वाचा घटक ठरणार आहे.  

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करणाऱ्या भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. जम्मू काश्मिरमध्ये सापडलेला हा साठा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियमचा साठा आहे. यामुळे बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथियम बनविण्यास गती मिळेल आणि मुख्य म्हणजे भविष्यात यासाठी इतर देशांवर भारताला अवलंबून रहावे लागणार नाही. लिथियम (Lithium) सापडलेले क्षेत्र चिनाब नदीवर बांधलेल्या 690 मेगावॅट क्षमतेच्या सलाल पॉवर स्टेशनपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. सलाल परिसरात जिथे लिथियमचे साठे सापडले आहेत, त्या परिसरात निवासी वस्ती नाही. तसेच पाण्याचे स्त्रोत बरेच आहे. लिथियमवर प्रक्रीया करण्यासाठी पाण्याचा मोठा वापर करावा लागतो. त्यामुळे हे सर्व पूरक असल्याची माहिती मिळत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियमचा साठा भारतात सापडला आहे. देशात लिथियमचा एवढा मोठा शोध हा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहने आणि इतर चार्जिंग उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटरीचा महत्त्वाचा घटक असलेल्या लिथियमची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. 

या महत्त्वाच्या धातूचे मोठे साठे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चिली, चीन, अर्जेंटिना आणि बोलिव्हिया या देशांमध्ये आहेत. भारताला सध्या लिथियमच्या आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे ही आयात काही प्रमाणात मंदावली आहे. लिथियम (Lithium) हे नाव ग्रीक शब्द ‘लिथोस’ वरून आले आहे.  लिथियम हा नॉन-फेरस धातू आहे. मोबाईल-लॅपटॉप, वाहनांसह सर्व प्रकारच्या चार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मूड स्विंग आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.  लिथियमच्या साठ्यापैकी 50% तीन दक्षिण अमेरिकन देशांमध्ये आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांचा ठसा अधिक होता. आता भारतात हा साठा सापडल्यानं व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातही भारताचे वर्चस्व सिद्ध होणार आहे.  

लिथियमचे महत्त्व खूप आहे.  600 किलो लिथियम (Lithium) -आयन बॅटरीपासून तेवढीच ऊर्जा मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाला 4000 किलो लीड-अॅसिड बॅटरीची आवश्यकता असते. अशा स्थितीत लिथियम-आयन बॅटर्‍या आगामी काळात ऊर्जेचा मोठा स्रोत ठरणार आहेत. यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम महत्त्वाचे बनले आहे.  यामुळे पेट्रोलचा वापरही मर्यादीत स्वरुपात करावा लागणार आहे.  आणि भविष्यात पेट्रोलच्या गाड्यांची निर्मितीही  कमी होईल.  एकूण पर्यावरणासही पूरक असेच ठरणार आहे.  

सन 2020 पासून, लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारत आपल्या लिथियम-आयन बॅटरीपैकी 80% चीनमधून मिळवतो. आता आपल्या देशातच लिथियम मिळाल्याने बॅटरी निर्मितीला चालना मिळेल.  शिवाय चीनला याचा मोठा फटका बसणार आहे.  भारत हा त्यांचा लिथियमसाठीचा (Lithium) सर्वात मोठा ग्राहक होता.  त्यामुळे भारताकडून हवे तसे व्यापारी धोरण चीन राबवत होता.  आता त्यावर रोख बसणार आहे.  

========

हे देखील वाचा : भारतातील ‘या’ राज्यांचा होणार विध्वंस, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

========

जम्मू काश्मिरच्या रियासी जिल्ह्यात सापडलेल्या या 5.9 लिथियम (Lithium) साठ्याची किंमत ऐकूनही चकीत व्हायला होतं. भारतात 59 लाख टन लिथियमचे साठे सापडले आहेत.   म्हणजेच आजच्या काळात त्याची किंमत 3,384 अब्ज रुपये एवढी आहे.  मात्र हा साठा उपयोगात आणण्यासाठी अजून अनेक प्रक्रीय कराव्या लागणार आहेत.  तसेच पूरक उद्योगही उभारले जाण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीरमधील लिथियमच्या (Lithium) प्रचंड साठ्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असलेल्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे 2030 पर्यंत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत 30% वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे.  लिथियमच्या साठ्याच्या शोधामुळे,  संपूर्ण जगात संदेश गेला आहे की भारत या क्षेत्रातही स्वयंपूर्ण होत आहे आणि लवकरच लिथियम (Lithium) निर्यातीत भारताला अग्रस्थान प्राप्त होणार आहे. जम्मू आणि काश्मीरसाठीही ही घटना गेमचेंजर ठरणार आहे. उद्योगासाठी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी, मोबाईल फोन उद्योगासाठीही ही मोठी गोष्ट असल्याचे जाणकार सांगतात.  याशिवाय स्थानिक रहिवाशांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.  याआधी 2021 मध्ये कर्नाटकात असाच लिथियमचा साठा सापडला होता. पण जम्मू काश्मिरमधील साठ्याच्या मानानं तो खूप कमी प्रमाणात आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....