Home प्रेस रिलीझ प्रेम मिळवण्याची धडपड मांडणाऱ्या ‘ठेच’चा ट्रेलर लाँच
प्रेस रिलीझ

प्रेम मिळवण्याची धडपड मांडणाऱ्या ‘ठेच’चा ट्रेलर लाँच

7
Thech Trailer

प्रेम मिळवण्यासाठीची धडपड ‘ठेच’ (Thech Trailer) या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कॉलेज जीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते.

शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

====

हे देखील वाचा: ‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या ‘न कळत’, रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

====

ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. टीजर आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...