Home प्रेस रिलीझ ‘स्वरलता… तुला दंडवत’ कार्यक्रमातून गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांना मानवंदना
प्रेस रिलीझमनोरंजन

‘स्वरलता… तुला दंडवत’ कार्यक्रमातून गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांना मानवंदना

11
‘स्वरलता... तुला दंडवत’

संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर म्हणजे लता मंगेशकर…. जातपात, धर्म, भाषा, प्रांत अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणारी ‘स्वरयात्रा’ नुकतीच विसावली. मात्र त्यांच्या स्वरांचं अक्षय्य चांदणं आपल्यावर सदैव बरसणार आहे. त्यांच्या गाण्यांचा, आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्यासमोर रिता करत ‘स्वरलता… तुला दंडवत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

झी टॉकीज प्रस्तुत या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर घेता येईल.

Lata Mangeshkar - IMDb

====

हे देखील वाचा: आयुष्याच्या शाळेत अशा घडल्या लता मंगेशकर 

====

निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत.

गायिका सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात लतादिदींच्या आठवणी आणि गाणी यांचा सुरेल संगम प्रेक्षकांना पहायला मिळेल.

लतादिदी यांचे सूरविश्व इतकं अथांग आहे की, यावर अनेक पिढया पोसल्या गेल्या आणि भविष्यातही जातील. झी टॉकीज वर सादर होणारा ‘स्वरलता… तुला दंडवत’ हा त्यांच्या स्मरणरंजनाचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय भेट असेल हे नक्की.

====

हे देखील वाचा: संगीत क्षेत्रातील एका सुरेल नक्षत्राचा अंत: लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

====

‘स्वरलता… तुला दंडवत’ या सांगीतिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...