Home मनोरंजन Gracy Singh : अभिनेत्री ग्रेसी सिंग बॉलिवूडला रामराम ठोकत बनली ‘ब्रह्मकुमारी’
मनोरंजन

Gracy Singh : अभिनेत्री ग्रेसी सिंग बॉलिवूडला रामराम ठोकत बनली ‘ब्रह्मकुमारी’

7
Gracy Singh

बॉलिवूड जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी चित्रपटसृष्टी. संपूर्ण जगभरात बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांना अफाट लोकप्रियता मिळते. नेम, फेम, मनी अशा सर्वच गोष्टी मोठ्या प्रमाणावर कलाकरांना मिळतात. म्हणूनच की काय अनेक लोकांचा या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी प्रयत्न असतो. मात्र बॉलिवूडमध्ये कायमच उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. आजवर अनेक कलाकार आले आणि गेलेत. (Gracy Singh)

मात्र जे कलाकार गाजलेच तेच पुढे आले आणि लोकप्रिय झाले. ज्या कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तेच कलाकार कायम लाइमलाईट्मधे असतात आणि गाजतात. ज्या कलाकारांना अपेक्षित फेम मिळत नाही ते हळूहळू या क्षेत्रातून गायब होतात. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सुरुवातीला बरेच यश मिळाले मात्र नंतर त्यांना यशाची चवच चाखता आली नाही. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे लगान फेम ग्रेसी सिंग. (Marathi News)

Gracy Singh

ग्रेसीने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मात्र तिला अमीर खानच्या लगान या सिनेमातून अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली देखील मात्र तिला मोठे यश मिळवता आले नाही आणि हळूहळू ती चित्रपटांमधून गायब झाली. पुढे ग्रेसी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील आली. येथे तिथे बराच काळ काम केले. मध्यंतरी गायब असलेली ग्रेसी अचानक आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण खूपच वेगळे आहे. (Top Stories)

ग्रेसी सिंगने ग्लॅमर जग सोडून अध्यात्माचा मार्ग स्विकारला आहे. ग्रेसीने ब्रम्हकुमारी संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे. आता ती ब्रम्हकुमारीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेताना दिसते. ती सध्या ध्यान, योग, सेवा या माध्यमातून आत्मिक विकास करतेय. ब्रम्हकुमारीमध्ये सहभागी झाल्यावर ग्रेसीने मुलाखतीमध्ये सांगितले, मी असीम सुरक्षा, शांती, आनंद, स्विकृती आणि सहयोगाचा अनुभव घेतला. ती ब्रह्मकुमारी इथे ग्रेसी तिच्या शास्त्रीय नृत्याद्वारे आध्यात्मिक संदेश देते. (Marathi Latest News)

ग्रेसी एक प्रशिक्षित भरतनाट्यम आणि ओडिसी डान्सर असून, ती ब्रम्हकुमारी प्रोग्राममध्ये आपल्या नृत्याच्या माध्यमातून आध्यात्मिक संदेश लोकांपर्यंत पोहचवत असते. ग्रेसी आता ४४ वर्षांची असून तिने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेसी शेवटची संतोषी मां या मालिकेत संतोषी मातेच्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान ग्रेसीबद्दल सांगायचे झाले तर, तिचा जन्म २० जुलै १९८० दिल्लीत झाला होता. त्यानंतर तिने १९९७ मध्ये अमानत या टीव्ही मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली. पुढे २००१ मध्ये आलेल्या लगान सिनेमातून ती रातोरात प्रसिद्ध झाली. (Top Marathi HEadline)

Gracy Singh

==============

     हे देखील वाचा : Parenting Tips : घटस्फोटानंतर मुलांचे पालकत्व कसे करावे?

==============

ग्रेसीने पुढे तिने ‘अरमान’ या चित्रपटात अनिल कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत काम केले. पुढे ती ‘ मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘चंचल’, ‘देशद्रोही’, ‘देख भाई देख’, ‘मुस्कान’ आदी काही चित्रपटांमध्ये दिसली. बॉलीवूडमध्ये अपयश मिळाल्यानंतर ग्रेसीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी, बंगाली आदी अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, या इंडस्ट्रीमध्ये देखील तिला जास्त यश मिळाले नाही. त्यानंतर २०१३ साली ग्रेसी सिंग यांनी ‘ब्रह्माकुमारी’मध्ये जागतिक आध्यात्मिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी या संस्थेच्या नियमांचं पूर्णपणे पालन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लागल्या. ग्रेसी ध्यान, योग आणि सेवेद्वारे अध्यात्मिक कार्यात गुंतलेली आहे. ती तिच्या अधिकृत वेबसाइटवरही तिचे हे बदलेले नवीन आयुष्य पाहायला मिळते. (Celebrity News)

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...