भगवान कृष्णाचा जन्मदिवस लवकरच येत असून अवघा देश या जन्माष्टमीच्या तयारीला लागला आहे. मात्र मथुरा आणि वृंदावनसह संपूर्ण ब्रजमध्ये गेल्या महिन्याभरापासून या सर्वात मोठ्या दिवसाची तयारी सुरु करण्यात आली आहे. ब्रजमध्ये कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सामान्य जन्माष्टमीपेक्षा खूप जास्त आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या भूमीमध्ये पावलापावलावर श्रीकृष्णाची मंदिरे आहेत. या सर्वच मंदिरांमध्ये जन्माष्टमी उत्सवासाठी मोठी तयारी सुरु झाली आहे. यावर्षी जन्माष्टमी नेमकी कुठल्या दिवशी आहे, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. पण वृंदावनामध्ये जन्माष्टमी दोन दिवसांमध्ये साजरी केली जाणार आहे. (Krishna Janmashtami)

15 आणि 16 ऑगस्ट रोजी हा कृष्ण जन्माचा सोहळा येथे साजरा होईल. इस्कॉन आणि बांके बिहारीसह सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा होईल. दरवर्षी ब्रजभूमीमध्ये हा सोहळा बघण्यासाठी जगभरातून करोडो भाविक दाखल होतात. मथुरा, वृंदावन सह बरसाना या राधारानीच्या नगरीमध्येही आत्तापासून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. ब्रजभूमीमधील सर्वच मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लिला सांगणारी प्रवचने आणि कीर्तन सोहळे सुरु झाली असून मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. कृष्ण जन्माष्टमीचा सण अवघ्या देशात मोठ्या थाटात साजरा केला जातो. पण या सर्वात ब्रजभूमीमधील जन्माष्टमी ही वेगळी मानली जाते. भगवान श्रीकृष्णांच्या लिला या ब्रजभूमीच्या गल्लोगल्ली गायल्या जातात. (Social News)
मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे आणि वृंदावन हे भगवान श्रीकृष्णाचे घर राहिले आहे. या दोन्ही शहरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्माष्टमीच्या उत्सवासाठी गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरु करण्यात येत आहे. मंदिरांची रंगरंगोटी झाली असून आता या मंदिरांवर फुलांची सजावट करण्यात येत आहे. वास्तविक वृंदावनसह बरसाना आणि मथुरेलाही सध्या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. मात्र असे असतांनाही या ठिकाणी अनेक भाविक यायला सुरुवात झाली आहे. येथील हॉटेल आणि आश्रमशाळा भाविकांनी फुलून गेल्या आहेत. यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. मथुरा, वृंदावन, बरसानामध्ये सध्या सगळ्याच मंदिरांमध्ये भजनाचे सोहळे सुरु करण्यात आले आहेत. जन्माष्टमीला, मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांवर जन्माभिषेक होतो. शंख, घंटा, जयजयकार आणि वैदिक मंत्रांनी हा सर्व परिसर दुमदुमून जातो. त्याचवेळी वृंदावनमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाललिला दाखवण्यात येतात. बांके बिहारी मंदिरात होणारा जन्माष्टमीचा उत्सव हा अनोखा असतो. (Krishna Janmashtami)

यावेळी वर्षातून एकदाच मंगला आरती होते. यावर्षी ही मंगला आरती 16 ऑगस्टच्या पहाटे 1:45 ते 2 दरम्यान होणार आहे. या आरतीनंर भाविकांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन करता येणार आहे. येथे रात्रभर भाविकांची मोठी गर्दी असते. वर्षातून एकदाच होणा-या मंगला आरतीला लाखो कृष्णभक्त उपस्थित असतात. यावेळीही अशीच भाविकांची गर्दी आरतीला रहाणार असल्यामुळे मंदिर प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. यासह इस्कॉन वृंदावन मंदिरांमध्येही जन्माष्टमी उत्सव आणि मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाची आरती कऱण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी इस्कॉन वृदांवनमध्ये मोठ्याप्रमाणात परदेशी भाविक दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत 40 हून अधिक देशातील श्रीकृष्ण भक्त येथे दाखल झाले असून कृष्णनामाचा अहोरात्र जप करण्यात येत आहे. वृंदावन येथील प्रेममंदिर बघण्यासाठीही हजारो भाविक उत्सुक असतात. या प्रेममंदिरातमध्ये जन्माष्टमीनिमित्तानं अधिक मनमोहक रोषणाई कऱण्यात येत आहे. (Social News)
==============
हे देखील वाचा : Janmashtami : मथुरेमध्ये स्थित आहे कुब्जा मंदिर, जिथे दर्शन घेतल्याने दूर होतात त्वचाविकार
===============
याशिवाय हजारो फुलांनी मंदिर सजवण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय येथे अखंड कीर्तन सुरु असून भगवान श्रीकृष्णाच्या लिला सांगितल्या जात आहेत. या सर्व मंदिरात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी बघता, मंदिराबाहेरील जागेत मोठे स्क्रिन लावण्यात येत असून त्यातून भाविकांना श्रीकृष्ण जन्मोत्सव पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वृंदावनच्या राधा रमण मंदिरातही जन्माष्टमी उत्सवासाठी तयारी सुरु झाली आहे. येथेही मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाची आरती होणार असून मंदिरात अखंड प्रवचन सुरु आहे. यासोबत वृंदावान, मथुरा येथे अनेक आश्रम आहेत. या आश्रमांमध्येही जन्माष्टमी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. सोबतच यमुना घाट आणि राधा रमण मध्येही सजावट केली जात असून येथे दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. (Krishna Janmashtami)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- . Radha Ramana Temple
- America
- Barsanam
- BJP
- china
- congress
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- india
- information
- International news
- ISKCON Vrindavan Temple
- Krishna Janmashtami
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- mathura
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Prem Mandir
- Radha Raman
- shri krushn aarti
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- Vrindavan
- Yamuna Ghat
- राजकारण