Home आंतरराष्ट्रीय Kolhapuri Chappal: इटालियन ब्रँडच्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलला स्थान, भारतीय संतप्त
आंतरराष्ट्रीय

Kolhapuri Chappal: इटालियन ब्रँडच्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलला स्थान, भारतीय संतप्त

17
Kolhapuri Chappal | Top Stories

कोल्हापूर म्हटले की, महालक्ष्मीच्या मंदिरासोबतच डोक्यात पटकन एक गोष्ट येते आणि ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल. कोल्हापूरला गेलेला व्यक्ती कधीच कोल्हापुरी चप्पल न घेता परतत नाही. कोल्हापूरची ओळख असलेली ही चप्पल ना केवळ कोल्हापूरची तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची शान आहे. राजा महाराजांच्या काळापासून कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये ही कोल्हापुरी चप्पल कमालीची गाजत आहे, आणि सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. (Kolhapuri Chappal)

झाले असे की, ही आपली कोल्हापुरी चप्पल एका जागतिक प्लँटफॉर्मवर झळकली आणि एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. प्राडा नावाच्या एका मोठ्या ब्रँडने नुकतेच आपले स्प्रिंग-समर कलेक्शन लॉन्च केले. या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी स्टाइल चप्पलचा देखील समावेश करण्यात आला आहे. अनेक मॉडेल्सने ही चप्पल घालून मोठ्या तोऱ्यात रॅम्पवॉक केला. मात्र इथेच माशी शिंकली. जेव्हा या फॅशन शोचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि भारतीय खासकरून महाराष्ट्रीय लोकांनी प्राडाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्राडाच्या अनोख्या स्टाइल कलेक्शनची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत होती, मात्र अशातच ही कंपनी वादात अडकली आहे. प्राडा या कंपनीने त्यांनी त्यांच्या कलेक्शनमध्ये लाँच केलेल्या कोल्हापुरी चप्पलाच्या स्टाइलचे श्रेय भारताला द्यायला विसरली आणि यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांकडे आणि या चप्पलाची खरी ओळख दुर्लक्षित झाल्यामुळे लोकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला. (Marathi News)

Kolhapuri Chappal

इटलीत मिलानमध्ये समर फॅशन शो सुरु आहे. या शोमध्ये मॉडेल्सने कोल्हापूरी चपल्ला परिधान करुन रॅम्प वॉक केला. मात्र या शोमध्ये मॉडेल्सने घातलेल्या कोल्हापूरी चप्पलचे क्रेडिट न मिळाल्याने भारतीय लोकांनी संताप व्यक्त केला आहे. यातही खास करून कोल्हापूरी चप्पल बनवणारे कारागिर संतप्त झाले आहेत. अतिशय महागडे आणि लक्झरी उत्पादनं बनवणारी कंपनी प्राडाने या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. प्राडा हा इटालियन ब्रँड असून, या ब्रँडचे कपडे, फुटवेयर, बॅग्स आणि फॅशनही संबंधित सर्वच वस्तू जगप्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे या कंपनीची उत्पादने लाखो रुपयांना विकले जातात. या कंपनीने सादर केलेल्या शो मध्ये मॉडेल्सच्या शरीरावर मॉडर्न डिझायनर कपडे, बॅग आणि पायात कोल्हापूरी चप्पल होती. (Todays Marathi News)

मुख्य म्हणजे फॅशन शो चे जानकार असलेल्या लोकांनी प्राडाच्या मॉडेल्सने घातलेली चप्पल ही इंडियन असल्याचे ओळखले आहे. आता सोशल मीडियावर भरमसाठ पोस्ट पडायला सुरुवात झाली आहे. लोकांनी या कंपनीच्या नावाने बोंबाबोंब करण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदाजानिया यांनी या शोचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, ‘ही कोणती डिझायनर सँडल नाही. ही कोल्हापूरी चप्पल आहे.’ (Top Marathi NEws)

=========

हे देखील वाचा : Atefeh Sahaaleh : या तरुणींचा शाप लागला इराणला ?

=========

या फॅशन शोमध्ये Prada या जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरीचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे ८०० ते १००० पर्यंत मिळते. मात्र महत्वाची बाब म्हणजे त्याच कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब कॉपी करून प्राडा या इटलीची कंपनीने जगभरात आपली कोल्हापुरी चप्पल १ लाख ५ हजारांना विकत असल्याचेही दावे होत आहेत. या खासगी कंपनीने भारताचा, महाराष्ट्राचा किंवा कोल्हापूरचा कुठेच उल्लेख न केल्याने सोशल मीडियावर कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांनी आणि भारतीय नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी तर राज्य आणि केंद्रीय सरकारने देखील यात हस्तक्षेप करत या प्रकरणाकडे लक्ष घालण्याची विनंती सर्वच जणं करत आहे. (Marathi Latest NEws)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...