आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे. कोजागिरी म्हणजे वर्षातील सर्वात महत्वाची पौर्णिमा. यादिवशी चंद्र अतिशय सुंदर तर दिसत असतोच मात्र ही एकमेव रात्र अशी असते जेव्हा चंद्र त्याच्या पूर्ण तेजात असतो आणि १६ कलांनी त्याची किरणे अमृतासारख्या दैवी औषधी गुणधर्मांनी भरलेली असतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील सांगितले जाते. असे म्हणतात की, याच दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रगट झाली होती. आज देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीची आर्थिक भरभराट होऊन देवी त्यावर कायम प्रसन्न राहते असे सांगितले जाते. (Kojagiri Purnima)
कोजागिरीचा हा दिवस धन आणि समृद्धीची लक्ष्मी देवी, विश्वाचे रक्षक भगवान विष्णू आणि चंद्र देव यांना समर्पित आहे. पौर्णिमा आज ६ ऑक्टोबर रोजी सुरू होत असल्याने आणि चंद्रोदय देखील आजच्याच दिवशी होणार असल्याने, कोजागिरी पौर्णिमेचे उपवास आणि पूजा फक्त ६ ऑक्टोबर सोमवार रोजीच केली जाणार आहे. आजच्या दिवसाला जेवढे महत्त्व लक्ष्मीच्या पूजनाचे आहे, तेवढेच महत्त्व दान करण्याला देखील आहे. आज जर आपण काही वैशिष्ट्य वस्तुंचे दान केले तर लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थैर्य लाभते. मग आज कोणत्या वस्तू तुम्ही दान करू शकता चला जाणून घेऊया. (Marathi News)
– कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ किंवा धान्य दान केल्याने चंद्रदेवांचा आशीर्वाद मिळतो. चंद्राला शांतीचे प्रतीक मानले जाते. तांदूळ दान केल्याने अन्नाचा साठा भरभरून मिळतो आणि आर्थिक समृद्धी येते. शिवाय, गहू दान केल्याने सूर्य देव यांचाही आशीर्वाद मिळतो. (Todays Marathi Headline)

– गुळ हे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने घरातील संपत्ती वाढते. गुळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. (Top Headline)
– या शुभ दिवशी दीप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पवित्र नदी किंवा तलावात दिवे दान करणे लाभदायक ठरू शकते. दीपदान केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते. (Latest Marathi Headline)
– कोजागिरीचा दिवस हा चंद्र आणि खीरशी संबंधित असल्याने दूध, दही आणि खीर यांसारखे पांढरे पदार्थ दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. खीर रात्रभर चंद्र प्रकाशात ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ती सेवन करणे आणि गरीब आणि गरजूंना खीर किंवा दूध दान करणे चांगले असते. कोजागिरी पौर्णिमेला दूध दान केल्याने घरात सकारात्मकता आणि आर्थिक लाभ मिळतो. तर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर दान केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. (Marathi Trending Headline)
=========
Kojagiri Purnima : यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्त्व?
Kojagiri Purnima : जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी
=========
– कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना पांढरे कपडे किंवा इतर कापड दान केल्याने जीवनातील त्रास कमी होतात. कपडे दान करणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. (Latest Marathi News)
– कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही फळांचं दान देखील करु शकता. फळांचे दान केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि धनाची प्राप्ती होते. (Top Trending News)
– शक्य असल्यास कोजागिरी पौर्णिमेला ब्राह्मणाला चांदीचे दान करा. चांदी दान करणे शक्य नसेल तर चंद्र देवाशी संबंधित इतर कोणताही पांढरा धातू दान केलेले चालते. यामुळे कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते. मन शांत होते आणि संपत्ती आणि समृद्धी वाढते. (Social News)
( टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- full moon day
- kojagiri
- Kojagiri purnima
- Kojagiri Purnima and Lakshmi puja
- Kojagiri Purnima and Lakshmi puja vidhi
- Kojagiri Purnima date 2025
- Kojagiri Purnima donate things
- Kojagiri purnima information
- Kojagiri Purnima kheer recipe
- Kojagiri Purnima prosperity
- Kojagiri Purnima puja
- Kojagiri Purnima remedies
- Kojagiri Purnima significance
- Kojagiri Purnima tithi
- Kojagiri Purnima vrat
- अश्विन पौर्णिमा
- आर्थिक भरभराट
- कोजागिरी आणि लक्ष्मी पूजन
- कोजागिरी पौर्णिमा
- कोजागिरी पौर्णिमा आणि लक्ष्मी पूजन
- कोजागिरी पौर्णिमा उपाय
- कोजागिरी पौर्णिमा कथा
- कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात?
- कोजागिरी पौर्णिमा दान
- कोजागिरी पौर्णिमा महत्त्व
- कोजागिरी पौर्णिमा माहिती
- कोजागिरी पौर्णिमा व्रत
- कोजागिरीला काय दान करावे?
- दान
- धनलाभ
- लक्ष्मी पूजन
- लक्ष्मी पूजन विधी
- शरद पौर्णिमा