Home मनोरंजन कॉफी विथ करण शोचा 7 वा सिझन लवकरच…काय असेल खास आकर्षण?
मनोरंजन

कॉफी विथ करण शोचा 7 वा सिझन लवकरच…काय असेल खास आकर्षण?

10
Koffee with Karan
Koffee with Karan

कलाकारांच्या खाजगी जीवनात नको तेवढं डोकवून त्यावर अश्लील वाटावी अशी टिपण्णी करुन वाद ओढवून घेणारा शो म्हणून ‘कॉफी विथ करण शो’ ओळखला जातो. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा या कार्यक्रमाचा होस्ट आहे.  19 नोव्हेंबर 2004 रोजी कॉफी विथ करणचा पहिला भाग स्टारवर झळकला. नंतर कायमच वादात राहिला पण तेवढीच प्रसिद्धही मिळाली. आता ‘कॉफी विथ करण’ शोच्या सातव्या सिझनचा नुकताच टीझर प्रसिद्ध झाला आहे.  हा शो 7 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहे. (Koffee with Karan season 7) 

करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करण सीझन 7 गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या शोचं वैशिष्ट म्हणजे अती गॉसिप. अर्थात या सातव्या भागातही हे गॉसिपींग कायम रहाणार आहे. “या टिझरमध्येच अंदाज करा कोण येत आहे….यावेळी अधिक गरमागरम चर्चा”, असं म्हणून शोमध्ये नेमकं काय होणार याची झलक दिली आहे.  

सुरुवातीला, करण जोहरने या शोबद्दल सस्पेन्स ठेवला होता. अगदी यावेळी आपण हा शो करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण टीझर आल्यावर करणच या शोचा होस्ट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या शोच्या सहाव्या सिझनमध्ये आलेले कलाकार शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, सैफ अली खान, प्रियांका चोप्रा सातव्या सीझनमध्येही दिसणार आहेत. (Koffee with Karan season 7) 

मे महिन्यात करण जोहरने शोच्या सेटवरील फोटो शेअर केले होते. या सीझनमध्ये अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा दिसणार आहेत. त्यांचा एक व्हिडिओही नुकताच सोशल मिडीयावर आलाय. यात दोघेही करण जोहरच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटातील नच पंजाबन या गाण्यावर नृत्य करत आहेत.  

करण जोहरचा हा शो अनेक टिकाकारांच्या टिकांचा धनी झाला आहे. त्यात अभिनेत्री कंगना रानावतचा क्रमांक वरचा लागतो. कंगना आणि करण मधलं वैर सर्वश्रृत आहे. कंगना कॉफी विथ करण या शोचा उल्लेख लोकांच्या वैयक्तीक जीवनात डोकवणारा आणि गॉसिप करणारा शो म्हणून करते.

अर्थात करणवर अशा टिकांचा काहीच परिणाम होत नाही. उलट तो शोच्या प्रसिद्धीसाठी याचा वापर करुन घेतो. मुळेच ‘कॉफी विथ करण’ हा स्टार वर्ल्डवरील प्रथम क्रमाकांचा टॉक शो झाला आहे. फूल खिले हैं गुलशन गुलशन या टॉक शो नंतर टिव्हीवर सादर होणारा हा दुसरा सर्वात जास्त काळ चालणारा टॉक शो ठरला आहे.  (Koffee with Karan season 7) 

कॉफी विथ करणची निर्मिती फजिला अल्लाना आणि कामना निरुला मिनेझिस यांनी केली. 2004 मध्ये स्टार परिवार अवॉर्ड्समध्ये हे दोघेही सहभागी झाले होते. त्यात करण जोहरच्या निवेदनावर ते बेहद खूष झाल. त्यातूनच त्यांना टॉक शोची कल्पना सुचली आणि ‘कॉफी विथ करण’ शो तयार झाला.  कॉफी पिताना कलाकारांच्या आयुष्यावर गप्पा मारायच्या, प्रेक्षकांना माहित नाहीत अशा कलाकारांच्या आयुष्यातील गोष्टी विचारायच्या ही साधी कल्पना या शो मागची होती. 

====

हे देखील वाचा – कधीही न मावळणारं फुल दीपिकाला देण्यासाठी रणवीरने केलं भलतंच  साहस… 

====

करण जोहरला बॉलिवूडमध्ये कोणी ओळखत नाही…वा करण जोहर कोणाला ओळखत नाही, असा कलाकार नाही. त्यामुळे तो सहजपणे कलाकारांना बोलतं करु शकेल आणि गॉसिपींग करु शकेल, अशी निर्मात्यांची अटकळ होती. करण जोहरनं ही निर्मात्यांची अपेक्षा प्रत्यक्षात उतरवली त्यातील रॅपिड फायरनं तर ‘कुप्रसिद्ध प्रश्नोत्तरे’ किताब मिळवला…कदाचित त्यामुळेच या शो चा आता सातवा सिझन सुरु होतोय.  (Koffee with Karan season 7) 

कॉफी विथ करणचा प्रीमियर शाहरुख खान आणि काजोल या जोडीसह झाला होता. त्यावेळी कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम हे हिट चित्रपट या जोडीच्या नावावर होते. या शोमध्ये आत्तापर्यंत  अमिताभ बच्चन, जया बच्चन, संजय लीला भन्साळी, फरहान अख्तर फराह खान, हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेरे,  ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन, टेनिसपटू महेश भूपती, लारा दत्ता, सलमान खान,  ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान, आमिर खान, किरण राव, अक्षय कुमार, इमरान हाश्मी, महेश भट्ट, अनुराग कश्यप, जुही चावला, रोहित शेट्टी राणी मुखर्जी, हृतिक रोशन, सैफ अली खान, संजय दत्त, एकता कपूर, जॉन अब्राहम, आलिया भट्ट, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, टेनिसपटू सानिया मिर्झा, दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या अशी अभिनेत्यांची आणि क्रीडाक्षेत्रातील तारकांची जंत्री या शोमध्ये सहभागी झाली आहे. (Koffee with Karan season 7) 

आता सातव्या सिझनमध्ये बॉलिवूडसोबत टॉलिवूडमधील अभिनेतही करणबरोबर कॉफी पित गॉसिपींग करणार आहेत. त्यामुळे हा सिझन अधिक नाविन्यपूर्ण असेल असा दावा करण्यात आला आहे.

– सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...