Home लाईफ स्टाईल Jonas Masetti : भारताचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री मिळवणारे जोनास मसेट्टी आहेत तरी कोण?
लाईफ स्टाईल

Jonas Masetti : भारताचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री मिळवणारे जोनास मसेट्टी आहेत तरी कोण?

11
Jonas Masetti

आपली हिंदू संस्कृती आणि भारतीय परंपरा खूपच समृद्ध आहे. जगातील सर्वात जुना धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख आहे. असे म्हणतात की, या धर्मामध्ये जन्मच घ्यावा लागतो हिंदू होण्यासाठी धर्मांतर करता येत नाही. असा हा अतिशय सुंदर, विशाल, गूढ हिंदू धर्म म्हणजे अनेकांसाठी अभ्यासाचाच एक भाग आहे. हिंदू धर्माचा किती अभ्यास केला तरी कमीच आहे. जेवढा तुम्ही या धर्माला ओळखायला लागतात तेवढाच तो अधिकच खोल होऊ लागतो. मातीच्या कणांपासून, पाण्याच्या थेंबापासून ते मनुष्यापर्यंत सर्वच गोष्टीं ईशवर वसलेले आहे. अशीच हिंदू धर्माची शिकवण आहे. (Jonas Masetti)

आज आधुनिक काळात जिथे आपण पाश्चात्य संस्कृतीला स्वीकारत हिंदू किंवा भारतीय संस्कृतीला कालबाह्य ठरवत आहोत. तिथेच परदेशातील अनेक लोकं हीच हिंदू संस्कृती स्वीकारत स्वतःला हिंदू म्हणून घेताना दिसत आहे. हे परदेशी लोकं आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा जगभर प्रसार करताना दिसत आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. यातलेच एक मोठे नाव म्हणजे जोनास मसेट्टी उर्फ विश्वनाथ. सध्या जोनास मसेट्टी हे नाव कमालीचे चर्चेत आले आहे. कारण नुकतेच जोनास मसेट्टी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे. (Marathi News)

Jonas Masetti

दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये जोनास मसेट्टी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. जोनास यांनी आपल्या रूपाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अनवाणी, गळ्यात रुद्राक्ष माळा, सुती धोती अशा सध्या रूपात जोनास हा पुरस्कार घेण्यासाठी आले. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ असलेल्या जोनास यांचे व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने पूर्ण होते. त्यांचे हे रूप सगळ्यांसाठीच सुखद धक्का आणि चर्चेचा विषय ठरला. सदर व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, ब्राझीलचे वेदांत आचार्य जोनास मसेट्टी आहेत. ज्यांना विश्वनाथ या नावाने देखील ओळखले जाते. (Top Stories)

भारत सरकारने जोनास मसेट्टी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे. त्यांना हा सम्मान भारतीय संस्कृती आणि परंपरा संपूर्ण जगभर पसरवण्यासाठी देण्यात आला आहे. जोनास यांनी मागील अनेक वर्षांपासून भारतीय हिंदू धर्म, ज्ञान, योग, वेदांत आदी अनेक गोष्टींना त्यांच्या ब्राजील देशासोबतच जगातील इतर अनेक देशांमध्ये पसरवण्याचे मोठे काम केले. (Social Updates)

कोण आहे जोनास मसेट्टी?

जोनास मसेट्टी यांचा जन्म ब्राजीलमध्ये झाला. त्यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंगचा अभ्यास करत डिग्री मिळवली. काही काळापर्यंत त्यांनी शेयर बाजारमध्ये देखील काम केले. असे असले तरी त्यांना आत्मिक समाधान मिळत नव्हते. आंतरिक शांतिसाठी त्यांनी अध्यात्माची वाट निवडली. भारतात येऊन त्यांनी खोलवर वेद, योग आणि अध्यात्म यांचा अभ्यास केला. ऋषिकेशमध्ये असलेल्या प्रसिद्ध वेदांत आचार्य स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमामध्ये राहून ज्ञान मिळवले. जोनास यांनी भारताला आणि भारतीय जीवन शैलीला जवळून पाहिले आणि समजून घेत ही संस्कृती स्वीकारली देखील. (Marathi Latest News)

Jonas Masetti

==========

हे देखील वाचा : Avinash Sable : आशियाई स्पर्धेत अविनाश साबळेने रचला इतिहास पटकावले सुवर्णपदक

==========

भारतात ज्ञान प्राप्त केल्यानंतर जोनास पुन्हा आपल्या मायदेशी परतले आणि ‘विश्वविद्या’ नावाने एक संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेद, ध्यान, भगवद्गीता आणि योग यांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. जोनास शिक्षणाने जवळपास १.५ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी प्रभावित झाले आहे. आज ते लाखो लोकांना भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे आणि हिंदू धर्माकडे आकर्षित करत आहेत. जोनास यांनी भारतीय संस्कृतीला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवला आणि अभिमानाने ते आज भारताचा प्रचार करत आहे. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात जोनास यांची प्रशंसा करत त्यांना भारतीय संस्कृतीचा ‘राजदूत’ ही पदवी दिली. (Todays Marathi News)

जोनास मसेट्टी परदेशी नागरिक असूनही त्यांनी भारतीय परंपरेला संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी ते खरे वाहक बनले. त्यांचा साधेपणा, भक्ती, त्याग आदी अनेक गोष्टींनी त्यांना पदमश्री हा पुरस्कार मिळवून दिला.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....