Home आरोग्य Sugarcane Juice : उन्हाळ्यात वरदान असलेल्या उसाच्या रसाचे फायदे
आरोग्यलाईफ स्टाईल

Sugarcane Juice : उन्हाळ्यात वरदान असलेल्या उसाच्या रसाचे फायदे

11
Sugarcane Juice

उन्हाळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘उसाचा रस’. उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच रसवंत्या सुरु होतात. पूर्वी फक्त उन्हाळ्यामध्ये मिळणार उसाचा रस आता तर बाराही महिने मिळतो. कडक उन्हामध्ये थंडगार उसाचा रस आपल्या शरीराला एक वेगळीच ऊर्जा आणि फ्रेशनेस देतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या उसाच्या रसाच्या प्रेमात असतात. बाहेर पडले की, एक ग्लास उसाचा रस पिणे हा तर अनेकांचा नियम असतो. आजच्या काळात विविध पॅकेटमधील ज्यूस किंवा आरोग्यास घातक बाहेरील कोल्डड्रींक्स घेण्यापेक्षा उसाचा रस पिणे कधीही उत्तमच असते. (Sugarcane Juice)

ऊस म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली जणू एक दैवी देणगीच आहे. आपल्या शरीराला या उसाच्या रसापासून अनेक फायदे होतात. शरीराला थंड करण्यासोबतच या रसामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन देखील उत्तम होते आदी असंख्य फायदे होतात. हा रस आपल्याला उष्ण सहन करण्यास अधिक ताकदवर बनवतो. विविध गुणांनी आणि खनिजांची समृद्ध असलेला उसाचा रस आपल्या भारतीय लोकांचे आवडते पेय आहे. अतिशय माफक दारात आपल्याला खूपच आरोग्यवर्धक पेय प्यायला मिळते. उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे तर अनेक चमत्कारिक फायदे शरीराला होतात. (Summer Health)

– उसाचा रस हे हायड्रेटिंग पेय आहे. उन्हाळ्यात सतत शरीरात पाण्याची कमतरता भासते. उसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात. हा उसाचा रस प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. (Marathi Top News)

Sugarcane Juice

– उसाच्या रसामध्ये नैसर्गिकरीत्याच भरपूर साखर असते. यामुळे या रसाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

– ऊसाचा रस हा एक नैसर्गिक औषध देखील आहे. लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हा उसाचा रस उपयुक्त ठरू शकतो. (Marathi Latest News)

– ऊसापासून काढलेला आणि फिल्टर न केलेला रस अनेक ठिकाणी रम, दारू, गूळ आणि ब्राउन शुगर तयार करण्यासाठी वापरला जातो.

– उसाचा रस स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून वापरता येतो. व्यायामानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Marathi Trending News)

– सगळ्यांचं माहित असेल की काविळीमध्ये ऊस किती गुणकारी आहे. उसाचा रस देखील कावीळपासून मुक्ती मिळवण्यासाठीही गुणकारी आहे. उसाचा रस आवश्यक असलेले पोषक तत्व मिळवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. (Marathi)

– उसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. त्यात ७५ टक्के पाणी आणि सुमारे १५ टक्के फायबर असतं. प्रक्रिया न केलेल्या उसाच्या रसात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

– उसाच्या रसामुळे शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचं प्रमाण वाढतं. उसाच्या रसामध्ये असलेले फायबर पचन क्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर करते. (Sugarcane Juice Benefits)

– यकृताचं कार्य सुधारण्यासाठी उसाचा रस पिणं चांगलं आहे. तज्ज्ञांच्या मते, यकृताचं आरोग्य राखण्यासाठी आणि यकृताशी संबंधित आजारांपासून वाचण्यासाठी हा रस वरदान आहे.

– स्त्रियांनी उसाच्या रसाचं नियमित सेवन केल्यानं मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

Sugarcane Juice

– उसाच्या रसात कोलेस्टेरॉल आणि सोडियम नसते. त्यामुळे ते किडनीसाठीही आरोग्यदायी आहे. हे प्यायल्याने किडनी निरोगी होते लघवी जाण्यास मदत होते. (Social News)

=======

हे देखील वाचा : Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटमधले खणखणीत नाणे : सचिन तेंडुलकर

Waxing : फेशियल वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी

=======

– उसाचा रस कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मँगनीजचा समृद्ध आहे. काही अभ्यासांनुसार हास रस कर्करोगाशी लढण्यास मदत करतो.

– डायबिटीस असणाऱ्या लोकांनी उसाचा रस पिणे चांगले नसते. त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. मात्र तुम्ही डॉक्टरांचा यावर सल्ला घेऊन रस प्यावा की नाही हे ठरू शकतो.

– उसाचा रस दात मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. शिवाय या रसामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होण्यास मदत होते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...