Home आरोग्य Curd : दररोज दही खाण्याचे फायदे
आरोग्य

Curd : दररोज दही खाण्याचे फायदे

11
Curd

अनेक घरांमध्ये आजही एक वेळचे जेवण चारी ठाव स्वयंपाक करून मग जेवले जाते. यात भाजी, पोळी, वरण, भात, चटणी, लोणचे, गोड काहीतरी आणि शेवटचे म्हणजे दही. या दह्याशिवाय आजही काही लोकांचे जेवण अपूर्ण असते. दररोज जेवणासोबत दही खाण्याची जणू आपल्याकडे परंपराच आहे. आजही अनेक महिला रोज घरी विरजण लावतात आणि रोज हेच फ्रेश दही खाल्ले जाते. अनेक लोकांना दही खाल्ल्याने त्रास होतो असे वाटत असल्यामुळे किंवा त्यांच्या या गैरसमजामुळे ते दही खाणे टाळतात. जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर होण्यास मदत होते. (Curd)

दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. मात्र खरंच असे करणे योग्य आहे का? दही खाल्ल्याने आपल्याला अनेक लाभ होतात. हे लाभ मिळवण्यासाठी दही खाल्ले गेलेच पाहिजे. केसातील कोंड्यापासून त्वचा मऊ करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. दही खाल्ल्याने आपले पाचन तंत्र ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. मग दही खाल्ल्याने नक्की कोणते फायदे आपल्याला होतात चला जाणून घेऊया. (Marathi News)

दात आणि हाडांच्या आरोग्य
एका अभ्यासानुसार, दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. जर रोज एक कप दही खाल्ले तर शरीराच्या रोजच्या कॅल्शियमची ४९% गरज यातून भागवली जाते.

हृदयाचे आरोग्य
दही व्हिटॅमिन बी आणि विशेषतः व्हिटॅमिन बी-12 आणि बी-2 म्हणजेच रिबोफ्लेविनमध्ये समृद्ध आहे. ही दोन्ही जीवनसत्त्वे हृदयरोग आणि काही न्यूरल ट्यूब जन्म दोषांपासून संरक्षण करू शकतात. (Top Stories)

Curd

रक्तदाब नियंत्रणात राहतो
दररोज एक कप दही खाल्ले तर आपल्या शरीराला २८% फॉस्फरस, १०% मॅग्नेशियम आणि १२% पोटॅशियम मिळते. ही सर्व खनिजे आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. त्यांच्या मदतीने, रक्तदाब संतुलित राहतो आणि चयापचय सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती
दह्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते. एका अभ्यासानुसार, दही आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे नैराश्यासारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. (Marathi Latest News)

वजन नियंत्रणात राहते
दह्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागण्यापासून वाचवतात. याशिवाय दह्याचे सेवन केल्याने चयापचय प्रणाली सुधारते. ही दोन्ही कारणे वजन नियंत्रणात मदत करतात.

शरीराला हायड्रेट ठेवते
दह्यामध्ये प्रचंड पौष्टिक मूल्य आणि भरपूर खनिजे व्यतिरिक्त, विशेष गोष्ट म्हणजे त्यात ६६% पाणी असते. त्यामुळे रोज दह्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते. (Top Marathi HEadline)

==========

हे देखील वाचा : Salad : सॅलड खाण्याचे फायदे आणि विविध सॅलड रेसिपी

==========

केसांसाठी लाभदायक
केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

त्वचेसाठी लाभदायक
चेहऱ्यावर, त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. (Social News)

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...