Home आरोग्य Non-Veg : सतत मांसाहार केल्यास शरीरास होऊ शकतात ‘हे’ तोटे
आरोग्यलाईफ स्टाईल

Non-Veg : सतत मांसाहार केल्यास शरीरास होऊ शकतात ‘हे’ तोटे

9
Non-Veg

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. एक उत्तम अभिनेत्री, कवयत्री असण्यासोबतच ती एक उत्तम उद्योजिका देखील आहे. ‘प्राजक्तराज’ या ब्रँडच्या अंतर्गत ती अनेक जुने, नवीन महाराष्ट्रीय दागिने ग्राहकांना रास्त किमतीत उपलब्ध करून देताना दिसते. यासोबतच तिच्याबद्दल एक चर्चा मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये कायम रंगताना दिसते आणि ते म्हणजे, तिचा फिटनेस. (Non-Veg)

प्राजक्ताने कमालीचा चांगला फिटनेस राखला आहे. याबद्दल नुकतेच तिने सांगितले की, ती योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाते आणि नियमित योगा करते. यासोबतच मागील काही वर्षांपासून तिने मांसाहारी जेवण देखील सोडले आहे. या जेवणामुळे शरीराला होणारे तोटे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मांसाहार पूर्णपणे बंद करत ती आता शाकाहारी झाली आहे. याची देखील तिला तिचा फिटनेस राखण्यास मोठी मदत झाली असल्याचे ती म्हणाली.(Health News)

मुलाखतीमध्ये प्राजक्ताने याबद्दल सांगितले की, “माणसाच्या शरीराला नॉनव्हेज पचवायला जवळपास ७२ तास लागतात. प्राणी आणि माणसं या दोघांची पचनसंस्था वेगळी आहे. मला वाटतं की नॉनव्हेज माणसांसाठी योग्य नाही. मी आधी नॉनव्हेज खायचे, मात्र जेव्हा मला याबद्दल समजले तेव्हा मी थांबले. मी नॉनव्हेज बंद करण्याचे ठरवले.” मग मांसाहार करण्याचे आपल्या शरीराला नक्की कोणते तोटे होतात, त्यातून शरीराची हानी कशी होते हे आपण या लेखातून जाणून घेऊया.(Non veg Disadvantage)

=========

हे देखील वाचा : Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !

==========

Non-Veg

आजचं आधुनिक काळात नॉन व्हेज खाणे हे जणू काही एक प्रेस्टिजच बनले आहे. जवळपास सर्वच लोकं आठवड्यातून किमान दोनदा तरी नॉन व्हेज खातात. मग हे नॉनव्हेज खाणे आपल्या शरीरासाठी खरंच फायदेशीर आहे का? नॉनव्हेज खाल्ल्याने होणारे फायद्याच्या भिंतीवर किती दिवस आपल्या शरीराची भिस्त टिकून राहणार आहे? कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जिथे फायदे आहेत, तिथे तोटे देखील आहेत. मग नॉनव्हेज खाल्ले की आपल्या शरीराला नक्की कोणते तोटे होतात. (Top Marathi News)

नॉनव्हेज आहाराचे काही तोटे:
हृदयविकार:
मांस आणि इतर नॉनव्हेज पदार्थांमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.

मधुमेह:
मांसाहारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

उच्च रक्तदाब:
नॉनव्हेज पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या येऊ शकते.

कर्करोग:
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जास्त प्रमाणात मांस खाल्ल्याने काही प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते, जसे की कोलन कर्करोग.

पचनसंस्थेच्या समस्या:
मांस पचनासाठी जास्त वेळ लागतो, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते, गॅस आणि एसिडिटीची समस्या येऊ शकते.

लठ्ठपणा:
नॉनव्हेज पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या येऊ शकते.

=========

हे देखील वाचा : Narendra Mann : कोण आहेत, नरेंद्र मान ?

==========

पर्यावरणावरील परिणाम:
मांसाहारासाठी मोठ्या प्रमाणावर प्राणी आणि शेतीची जमीन वापरली जाते, ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.

मांसाहाराचे सेवन केल्यास मधुमेह, हाडे कमकुवत होणे, हाडांच्या आणि ऑस्टियापोरोसिस आजार आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात मांसाहाराचा समावेश न करण्याचा सल्ला तज्ज्ञ लोकं देताना दिसतात. सतत मांसाहार खाल्ल्याने माणसाच्या सरासरी आयुष्यात घट होऊ शकते. त्यामुळं मांसाहार खाणे टाळणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. मांसाहार न खाता आहारात भात, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास आरोग्य निरोगी राहू शकते. (Trending Health News)

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...