Home लाईफ स्टाईल Holi : जाणून घ्या धूलिवंदन आणि रंगपंचमीमधला फरक
लाईफ स्टाईलसामाजिक

Holi : जाणून घ्या धूलिवंदन आणि रंगपंचमीमधला फरक

12
Holi

होळी अर्थात रंगांचा उत्सव. संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात विविध पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या होळीला महाराष्ट्र्रातील कोकणात ‘शिमगा’ म्हटले जाते. होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत असा पाच दिवस साजरा केला जातो. मात्र आजच्या आधुनिक काळात होळी म्हणजे फक्त रंग खेळणे एवढेच समीकरण झाले आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळीकडे धूलिवंदन साजरे केले जाते. धुलीवंदनलाच काही ठिकाणी धुळवड देखील म्हटले जाते. (Holi)

होलिका दहन ते रंगपंचमी असा हा सण साजरा होतो. नेहमी कॅलेंडरमध्ये आपल्याला होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी असे लिहिलेले दिसते. मात्र जर धुलिवंदनलाच रंग खेळले जातात तर रंगपंचमी का आणि कोण साजरी करते? असा प्रश्न अनेकदा बऱ्याच लोकांना पडत असेल. आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. आज आपण या लेखातून धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन सणांमधील फरक जाणून घेणार आहोत.(Marathi Top Stories)

Holi

प्रल्हादने त्याची भगवान विष्णुबद्दल असलेली भक्ती सिद्ध करण्यासाठी त्याच्या वडिलांनी केलेल्या अनेक शिक्षा बिनबोभाट सहन केल्या. प्रत्येक परीक्षेतून तो अधिक दृश्य आणि अधिक ताकदीने आपली भक्ती सिद्ध करत होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिकेला तिला मिळालेल्या वरदानाचा वापर करत प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसण्यास सांगितले तेव्हा ती तयार झाली. तिने स्वतःला पेटवून घेतले मात्र प्रल्हादाची भक्ती आणि नामस्मरण अजिबातच खंडले नाही की, तो भयभीत झाला नाही. विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिका भस्म झाली. याच वाईट प्रवृत्तीचा विजय साजरा करण्याच्या हेतूने होलिका दहन केले जाते. (Holi Festival information)

======

हे देखील वाचा : Holi : होळी सणाचे महत्व आणि माहिती

======

होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी धुळवड किंवा धूलिवंदन साजरे होते. आजकाल अनेकांना या दिवसाचे महत्व, माहिती किंवा इतिहासच माहित नाही. म्हणूनच धुलिवंदनाचाच दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळाला जातो. खरं तर उत्तर भारतात होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळाला जातो. हीच पद्धत आता महाराष्ट्रात देखील चालू झाली आहे. तसे पाहिले तर महाराष्ट्रात रंग पंचमीला रंग खेळाला जातो. मात्र आता असे होताना दिसत नाही.(Dhulivandan)

महाराष्ट्रातील रंग पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आधुनिक काळात मागे पडताना दिसत आहे. धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रात रात्री होळी पेटवल्यानंतर सकाळी होळी काहीशी थंड झालेली असते. जी राख उरलेली असते ती एकमेकांना लावली जाते. यासोबतच ही राख पाण्यात मिसळून त्या पाण्याने अंघोळ देखील केली जाते. राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते.(Maarthi Trending News)

काही ठिकाणी संपूर्ण जाळून गेलेल्या होळीचा विस्तव पेटत असतो. त्यावर पाणी ठेऊन त्या तापलेल्या पाण्याने अंघोळ केली जाते. असे म्हटले जाते की यामुळे येणार उन्हाळा बाधत नाही. यासोबत संध्याकाळी आजही अनेक गावात शहरात विविध वेशभूषा करून मुले, तरुण जमतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. याला ‘वीरांची मिरवणूक’ किंवा ‘वीरांचा पाडवा’ असं म्हणतात. अशा पद्धतीने धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवडचा दिवस साजरा केला जातो. (Dhulivandan Information)

======

हे देखील वाचा : Holi : होळीमध्ये त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

======

रंगपंचमी ही होळीच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. आजच्या आधुनिक काळात सर्वच मराठी लोकं आपली संस्कृती आणि परंपरा विसरून गेल्याचे दिसते. सर्वच जणं सर्रासपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे आजकाल महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जात आहे. रंगपंचमीला रंग खेळून गुलालाची उधळण करून हा दिवस साजरा करतात. नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी रहाडी परंपरा झोपासली जाते, पेशवेकाळापासून असणाऱ्या या रहाडीची ही परंपरा रंगपंचमीचे वैशिष्ट्य आहे. (Rangpanchami)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....