अशोक सराफ….बस नाम ही काफी है….या नावाला मनोरंजनविश्वात मोठे वजन आहे. कॉमेडीला एक नवीन उंची, नवीन आयाम देण्यात अशोक सराफ यांचा मोठा वाटा आहे. मागील अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने अविरत अशोक सराफ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमात काम करत अशोक सराफ यांनी अष्टपैलू अभिनेता अशी ओळख तयार केली आहे. आज अशोक सराफ त्यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदाचा त्यांचा वाढदिवस खूपच खास आहे, कारण नुकताच त्यांना भारत सरकारकडून सर्वोच्च असा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Ashok Saraf)
अशोक सराफ यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल. त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोजता येणार नाही एवढ्या उपलब्धी मिळवल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना त्यांनी कायमच मराठीचा अभिमान बाळगला. अशोक सराफ हे सर्वच लहान मोठ्या, नवीन जुन्या कलाकारांसाठी अभिनयाचे, विनोदाचे विद्यापीठच आहे. अभिनय करताना काय करावे हे सगळेच लोकं सांगतात, मात्र काय करू नये हे फक्त अशो सराफच सांगू शकतात. हीच तर त्यांची खुबी आहे. इंडस्ट्रीमध्ये वावरताना त्यांनी कधीच मोठेपणाचा बुरखा मिरवला नाही. (Marathi News)
नवीन जुन्या सर्वच कलाकारांना एकाच तराजूत तोलणारे अशोक सराफ सर्वच इंडस्ट्रीचे लाडके अशोक मामा आहेत. त्याच्यासोबत काम करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते, मात्र खूप कमी कलाकारांनाच ही संधी मिळते. प्रेक्षकांसाठी तर अशोक सराफ हे दैवतच आहे. मात्र तुम्ही सर्वांनी जर कधी निरीक्षण केले असेल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की सर्वच अशोक सराफ यांना इंडस्ट्रीमधले आणि इंडस्ट्री बाहेरील सर्वच लोकं त्यांना प्रेमाने अशोक मामा या नावाने हाक मारतात. पण खूप कमी लोकांना या नावामागील किस्सा माहित असेल. आज अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया असोफ सराफ यांना ‘मामा’ नाव कसे मिळाले याबद्दल. (Top Stories)

आधी सर्वच अशोक सराफ यांना ‘अशोकजी’ म्हणायचे, मात्र नंतर त्यांना ‘मामा’ हे नाव पडले जे आजतागायत कायम आहे. हे नाव पडण्यामागे खुद्द अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी ती लहान मुलगी सतत अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत असे. त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असे सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या निमित्ताने सेटवरील सर्वच जण त्यांना मामा अशी हाक मारु लागले. पुढे हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारु लागले.” (Todays Marathi Headline)
अशोक सराफ यांचा ३ जून जन्म १९४७ साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते मुळचे बेळगावचे असले तरी त्यांचे दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या १८ व्या वर्षी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती’ आणि ‘देवयानी’ या नाटकांमधून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत. गेल्या पाच दशकांपासून अशोक मामांनी मराठी सोबतच हिंदी प्रेक्षकांचेही निखळ मनोरंजन केले. या काळात त्यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Top Marathi Headline)
==========
हे देखील वाचा : Ashok Saraf : ‘अशोक-रंजना बाहेर या….’ जेव्हा नाशिकला हॉस्पिटल बाहेर चाहत्यांनी घातला गोंधळ
जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी
==========
८०- ९०च्या दशकात सरकारी नोकरी सोडून अभिनयात प्रवेश करताना अशोक सराफ यांना आई- वडिलांचे आणि नातेवाईकांची खूप बोलणी ऐकावी लागली होती. त्यांनी जवळपास १० वर्षे ही नोकरी केली होती. सरकारी नोकरी करत असताना ते सतत एक अभिनेता होण्याचे स्वप्न पाहायचे. मामांना बँकेत महिन्याला २३५ रुपये पगार होता. मिळालेल्या या पगारातील २०० रुपये ते घरी द्यायचे. उरलेल्या ३५ रुपयांत ते आपला महिन्याचा खर्च भागवायचे. विशेष म्हणजे वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळावे यासाठीही ते ३५ रुपयांमध्ये बचत करायचे. बँकेच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये १० पैशांना पाव मिळायचा आणि १५ पैशांची पातळ भाजी मिळायची. हेच त्यांचं दुपारचं जेवण असायचे. (Marathi Latest News)
- Ashok Saraf
- Ashok Saraf aka ashok mama
- Ashok Saraf Birthday
- Ashok Saraf incident
- ashok saraf information
- ashok saraf interview
- ashok saraf movie
- ashok saraf news
- comedy king Ashok Saraf
- Marathi Actor
- marathi actor ashok saraf
- padmashree Ashok Saraf
- अभिनेते अशोक सराफ
- अशोक मामा
- अशोक मामा नाव
- अशोक सराफ
- अशोक सराफ किस्सा
- अशोक सराफ माहिती
- अशोक सराफ वाढदिवस
- पद्मश्री अशोक सराफ