Home आरोग्य Food Pack: अन्नाच्या पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम फॉईल आणि बटर पेपर नक्की चांगले काय?
आरोग्यलाईफ स्टाईल

Food Pack: अन्नाच्या पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम फॉईल आणि बटर पेपर नक्की चांगले काय?

12
Food Pack

पूर्वी स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये दुपारच्या जेवणासाठी लोकं शेतावर किंवा कामाला भाकरी घेऊन जायचे. मात्र काळ बदलला तसा ‘डब्बा’ ही कन्सेप्ट आली. हळूहळू ‘डब्बा’ मागे पडला आणि ‘टिफिन’ आला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये ‘डब्बा’ लाजिरवाणा वाटू लागल्याने ‘टिफिन’ शब्द प्रचलित झाला. मग सो कोल्ड सोफिस्टिकेडिटेड वातावरणात टिफिन देखील योग्य पद्धतीने नेला पाहिजे असे सर्वांनाच वाटू लागले. (Food Pack)

मग पोळ्या, पराठा, पुरी आदी पदार्थ नुसते टिफिनमध्ये न घेऊन जाता ते अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून अर्थात रॅप करून नेण्याची पद्धत रूढ झाली. अर्थात याचे फायदे देखील नक्कीच होते किंबहुना आहेत. आपण नेत असलेला टिफिन अधिक काळ ताजा आणि गरम राहणासाठी याची मदत होते. अ‍ॅल्युमिनियम फॉइल लोकप्रिय असतानाच बटर पेपर देखील हळूहळू प्रसिद्ध झाला. आता आमच्यारख्या सध्या भोळ्या गृहिणींची , काम करणाऱ्या काही महिलांची झाली का पंचायत? नवऱ्याला, पोरांना, स्वतःला टिफिनसाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरावी की बटर पेपर वापरावा हेच समजत नाही.(Aluminium Foil and Butter Paper)

तुम्हालाही हा प्रश्न अनेकदा पडतो ना…? अ‍ॅल्युमिनियम फॉइल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारण आहे असे आपण अनेकदा ऐकले? मग ते खरे आहे का? या अ‍ॅल्युमिनियम फॉइल आणि बटर पेपर यांच्यापैकी नक्की काय चांगले या वैचारिक द्वंद्वामध्ये नक्की कोणाचा विजय करायचा समजतच नाही ना. आज आपण या लेखातून याच वैचारिक गोंधळाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Marathi Top Stories)

=======

हे देखील वाचा : Fairness Cream : सावधान! नियमित फेयरनेस क्रीमचा वापर करताय…? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

=======

Food Pack

अ‍ॅल्युमिनियम फॉइलचे फायदे:
अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न बराच वेळ गरम राहते. तसेच अ‍ॅल्युमिनियम फॉइलही मायक्रोवेव्ह सेफ देखील आहे. त्यात पॅक केलेले अन्न लवकर खराब होत नाही. अ‍ॅल्युमिनियम फॉइल उच्च तापमान सहन करू शकते, म्हणून आपण अनेकदा याचा वापर बेकिंग आणि ग्रिलिंगमध्ये सुद्धा केला जातो. शिवाय अ‍ॅल्युमिनियम फॉइल ही लवचिक आणि हलकी आहे. आपण तिला आपल्याला हवे असेल तसे फोल्ड करू शकतो. शिवाय या फॉइलचा वापर पुन्हा पुन्हा देखील केला जातो.(Aluminium foil Advantages)

अ‍ॅल्युमिनियम फॉइलचे तोटे
अ‍ॅल्युमिनियम फॉइल ही व्हिटॅमिन सी युक्त फळांसाठी किंवा पदार्थांसाठी ॲल्युमिनियम फॉईल ही सुरक्षित नाही. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ किंवा फळं ॲल्युमिनियम फॉईलमध्ये आपण गुंडाळतो तेव्हा ती खराब होण्याची भीती जास्त असते. गरम अन्नपदार्थ हे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवल्याने किंवा ॲल्युमिनियम फॉईलसह अन्नपदार्थ गरम केल्यास उष्णतेमुळे फॉइलमध्ये असलेले ॲल्युमिनियम वितळून विरघळण्याचा धोका असतो. असे ॲल्युमिनियम मिश्रित अन्न आपण खाल्ल्यास आपल्या शरीराला धोका असू शकतो. अ‍ॅल्युमिनियममुळे न्यूरोलॉजिकल विकार (जसे की अल्झायमर) आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.  (aluminium foil Disadavantages)

बटर पेपरचे फायदे :

बटर पेपर पूर्णपणे नॉन-स्टिक नसतो. त्यामुळे अन्न त्यावर चिकटत नाही. बटर पेपर सेल्युलोज पासून तयार केला जातो. ज्यामुळे खाद्यपदार्थातील अतिरीक्त तेल शोषून घेण्यास मदत होते. यामुळे अन्न ताजे राहते. तसेच, बेकिंग आणि फूड रॅपिंगसाठी हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. बटर पेपर हा केमिकल विरहित असल्याने याच्या वापरामुळे अन्नात कोणतेही हानिकारक कण मिसळले जात नाही. (Butter Paper Advantages)

Food Pack

आरोग्याच्या दृष्टीने बटर पेपर हा उत्तम पर्याय आहे. मधल्या काही काळापासून बटर पेपरचा वापर खूपच वाढलेला दिसत आहे. हॅाटेल्समध्ये पार्सल किंवा पदार्थ देण्यासाठी बटर पेपरचा वापर केला जातो. खारट किंवा मसालेदार पदार्थ पॅक करण्यासाठी देखील बटर पेपरचा वापर केला जात आहे. ॲल्युमिनियम फॉईलला पर्याय म्हणून वापरला जाणारा बटर पेपर हा फॉईलच्या तुलनेत आरोग्यासाठी फायद्याचा ठरताना दिसत आहे. म्हणूनच बर्गर, फ्रँकी, किंवा मिठाईंच्या बॉक्समध्ये बटरपेपरचा वापर केला जातो. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Sweet Potato : रताळे खाताय तर सालासकट खा आणि मिळवा ‘हे’ मोठे फायदे

=======

बटर पेपरचे तोटे : (Butter Paper Disadvantages)

बटर पेपर जरी ॲल्युमिनियम फॉईलपेक्षा अनेक बाबतीत सरस असला तरी तो फॉइल इतके चांगले इन्सुलेशन देत नाही, त्यामुळे यात अन्न जास्त काळ गरम राहत नाही. तसेच हा पेपर खूप जास्त तापमान देखील सहन करू शकत नाही. खासकरून जर बटर पेपर वॅक्स-कोटेड असेल तर नक्कीच नाही. बटरपेपर हे आरोग्यासाठी सुरक्षित जरी असले. तरीही त्याचा दीर्घकालीन वापर आरोग्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. (Trending Marathi News)

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...