Home मनोरंजन प्रेमापुढे सर्व काही दुय्यम असते, मिलिंद सोमण आणि अंकिता यांच्या प्रेमकहाणी केले हे सिद्ध 
मनोरंजन

प्रेमापुढे सर्व काही दुय्यम असते, मिलिंद सोमण आणि अंकिता यांच्या प्रेमकहाणी केले हे सिद्ध 

9
Milind Soman Ankita Anniversary
know about milind soman and ankita konwar love story

बॉलिवूड अभिनेता असलेला मिलिंद सोमण हा त्याच्या अभिनय, मॉडलिंगपेक्षा अधिक त्याच्या फिटनेसमुळे जास्त ओळखला जातो. वयाच्या ५५व्या वर्षी मिलिंदचा फिटनेस खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. तो त्याच्या फिटनेसच्या बाबतीत अनेक मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देतो. मिलिंदला एक अभिनेता म्हणून त्याला अपेक्षित यश मिळाले नसले तरी, एक मॉडेल आणि एक ऍथलेटिक म्हणून तो खूपच प्रसिद्ध आहे. मिलिंदचे फिटनेस हा मुद्दा तर त्याला नेहमीच चर्चेत ठेवतो. मात्र त्याला प्रकाशझोतात ठेवणारा अजून एक मुद्दा म्हणजे मिलिंदचे खासगी आयुष्य किंबहुना मिलिंदचे वैवाहिक आयुष्य. 

मिलिंद आणि मिलिंदचे वैवाहिक आयुष्य नेहमीच त्याला मीडियामध्ये लाईमलाइटमध्ये ठेवत आले आहे. मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर यांचे नाते खासकरून त्यांचे लग्न आणि प्रेमकहाणी नेहमीच मीडियामध्ये गाजताना दिसते. या दोघांच्या नात्याबद्दल आजपर्यंत आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील मात्र त्या दोघांमध्ये असलेले वयाचे अंतर हा तर अतिशय गाजलेला मुद्दा ठरला. मात्र यासर्व पलीकडे जाऊन त्यांनी त्यांचे प्रेम लग्नापर्यंत नेले आणि २२ एप्रिल २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न केले. मिलिंद आणि अंकिता दोघेही फिटनेसप्रेमी असल्याने त्यांच्यामध्ये हाच एक महत्वाचा आणि साम्य असलेला मुद्दा ठरला. आज दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल. 

अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण यांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली. त्या क्लबमध्ये दोघांची नजरानजर झाली आणि अंकिताने मिलिंदला डान्ससाठी विचारणा केली. मिलिंदने देखील होकार दिला आणि या दोघांनी बराच वेळ एकत्र डान्स केला. तिथून बाहेर पडताना मिलिंदने अंकिताचा नंबर घेतला. पुढे या दोघांचे फोनवर बोलणे आणि भेटणे चालू झाले. पुढे हे दोघं खूपच चांगले मित्र झाले. तेव्हा अंकिता एका रिलेशनशिपमध्ये होती. मात्र एक दिवस अचानक अंकिताच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंकिता पूर्णपणे कोलमडली. या घटनेतून ती बाहेरच येत नव्हती. अशा वेळेस आपल्या चांगल्या मैत्रिणीला यातून बाहेर काढण्यासाठी मिलिंदने खूप प्रयत्न केले आणि तो त्यात यशस्वी झाला. 

या घटनेमुळे हे दोघे अधिकच घट्ट आणि चांगले मित्र झाले. पुढेही त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. अखेर एक दिवस मिलिंदने मोठ्या हिंमतीने अंकिताकडे त्याचे तिच्यावरील प्रेम व्यक्त केले. तो अंकिताला म्हणाला, “जेव्हा माझे तुझ्यावर प्रेम जडले तेव्हा ते तुझ्या प्रत्येक गोष्टीसोबतच जोडले गेले. त्या गोष्टीसोबत देखील जिची सावली तुझ्या भूतकाळावर आहे आणि तिचे ओझे घेऊन तू तुझे जीवन जगत आहे. घाबरू नको, आपण सोबत आलो तर दोघे मिळून या गोष्टींचा सामना करू.” त्याचे बोलणे एकूण अंकिता खूपच भावूक झाली आणि लगेचच तिने तिचा होकार मिलिंदला दिला.

मिलिंद आणि अंकिता या दोघांनी एकमेकांना तब्ब्ल ५ वर्ष डेट केले आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न एवढे सोपे नव्हते कारण या दोघांमध्ये तब्बल २५ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे मिलिंद आणि अंकिताचे लग्न लोकांच्या चर्चेचा आणि सोशल मीडियावरील चर्चेचाच विषय बनला. त्या दोघांवर खूपच टीका झाली. ट्रोल केले गेले. मिलिंदचे हे दुसरे लग्न असूनही चर्चा फक्त त्यांच्या असणाऱ्या वयाच्या अंतराचीच होती. मात्र यासर्व गोष्टींकडे त्या दोघांनी आणि त्यांच्या परिवाराने दुर्लक्ष केले आणि २२ एप्रिल २०१८ साली अलिबागमध्ये मराठी पद्धतीने लग्न केले. पुढे जुलैमध्ये पुन्हा त्यांनी स्पेनमध्ये कॅथलिक पद्धतीने लग्न केले. त्यांचे लग्न हे त्यांच्यात असणारे वयाच्या अंतरामुळे सर्वात जास्त गाजले.

=======

हे देखील वाचा – अखेर देसी गर्लने जाहीर केले तिच्या मुलीचे नाव, दोन्ही संस्कृतींचा दिसला संगम 

======= 

आज लग्नाच्या चार वर्षांनी देखील हे हॉट कपल नेहमीच त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे चर्चेत असते. अनेकदा दोघं सोशल मीडियावर त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात आणि त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करतात. आजही अंकिता आणि मिलिंद ग्लॅमर जगातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि गाजणारे कपल म्हणून ओळखले जाते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...