Home लाईफ स्टाईल Kitchen Tips : ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून चाकू, कात्रीला द्या घरच्या घरी धार
लाईफ स्टाईल

Kitchen Tips : ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून चाकू, कात्रीला द्या घरच्या घरी धार

12

आपल्या सगळ्यांच्याच घरात सूरी, कात्री, विळी अशा अनेक धारदार वस्तू असतात. ज्याचा वापर आपण बहुतकरून किचनमध्ये काम करताना करतो. भाज्या चिरण्यासाठी, काही कापण्यासाठी, खोबरे खवण्यासाठी आदी अनेक कामांमध्ये या वस्तू उपयोगी येतात. या धारदार वस्तूंचा वापर देखील खूप असतो. मात्र जसजशा आपण या धारदार वस्तू वापरत जातो, किंवा या वस्तू जुन्या होतात तसतशी या वस्तूंची धार कमी होते. दरवेळी धार कमी झाल्यावर नवीन वस्तू घेणे सोयीस्कर असते असे नाही. (Kitchen Tips)

या धारदार वस्तूंची धार कमी झाल्यामुळे काय होते…? तर आपल्याला कामाला खूपच वेळ लागायला लागतो. जिथे भाजी चिरण्याचे काम ५ मिनिटांमध्ये संपतं तिथे १०/१५ मिनिटं लागायला लागतात. आणि मुख्य म्हणजे घाईच्या वेळेतच अशा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे कामाला वेळ लागतो आणि आपली देखील चिडचिड होते. मग अशा वेळेस काय करावे जेणेकरून आपले काम पण होईल आणि त्रास पण होणार नाही? आज आम्ही तुम्हाला असे काही साधे आणि सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तात्पुरती किंवा कधी कधी दीर्घ काळासाठी देखील किचनमधल्या कटलरीला झटपट धार लावू शकता आणि वापरू शकता. (Kitchen Tricks)

मीठ (Salt)
तुमच्या कात्रीला किंवा चाकूला पटकन धार द्यायची असेल तर मिठाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. यासाठी मीठ हलक्या हाताने चाकू – कात्री किंवा कोणत्याही धारदार वस्तूवर फिरवा. यामुळे ब्लेडवरील गंज किंवा अशुद्धता निघून जाते आणि तुमची वस्तू पुन्हा धारदार होते. (Marathi News)

Kitchen Tips

ॲल्युमिनियम फॉइल (Aluminum foil)
आपल्या सगळ्यांच्या घरात ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास केला जातो. मात्र याच ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करून तुम्ही घरातील चाकू – कात्री आदी वस्तुंना धार देऊ शकता. यासाठी ॲल्युमिनियम फॉइल घेऊन त्याची चार पाच वेळा घडी करायची आणि ही घडी घातलेली फॉइल कात्रीने सतत कापत राहा. काही वेळानंतर तुम्हाला कात्रीला धार आल्याचे जाणवेल. (Top Stories)

Kitchen Tips

टूथपेस्ट (Toothpaste)
टूथपेस्टमध्ये असलेले बारीक ग्रॅन्युल्स कोणत्याही गोष्टीला स्वछ किंवा चमकदार करू शकतात. टूथपेस्टचा वापर करून देखील चाकू आणि कात्रीला धार दिली जाऊ शकते. टूथपेस्ट चाकू, कात्री किंवा कोणत्याही धारदार वस्तूवर टाका आणि स्क्रबच्या मदतीने तो भाग घासा. असे केल्याने ब्लेडवरील घाण दूर होते आणि धार अधिक तीव्र होते. (Marathi Latest News)

Kitchen Tips

जुन्या सिरेमिक कप (Ceramic Cup)
आपल्या घरात अनेकदा जुने कप पडलेले असतात. जे आपण वापरात नाही, मात्र हे कप तुमच्या बोथट झालेल्या वस्तुंना धार देण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. यासाठी एक सिरेमिक कप घेऊन त्याच्या खालच्या खरखरीत भागावर सुरी किंवा कात्री हळूहळू घासावी. कपाच्या पृष्ठभागामुळे चाकू किंवा कात्रीचा बोथट भाग पुन्हा धारदार होतो. (Lifestyle News)

Kitchen Tips

==========

हे देखील वाचा : Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

==========

सहान (Sahan)
बऱ्याच घरांमध्ये सहान असते. खासकरून चंदन उगाळण्यासाठी तिचा वापर केला जातो. हीच सहान वापरून चाकू आणि कात्रीला धार लावली जाऊ शकते. यासाठी सहानीवर थोडेसे तेल टाका आणि नंतर त्यावर चाकू किंवा कात्री काही वेळ फिरवा. सहानाच्या पृष्ठभागामुळे ब्लेडची धार परत तीव्र होते.

Kitchen Tips

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....