Home लाईफ स्टाईल करण जोहरच्या वेट लॉस जर्नीचे सीक्रेट, घ्या जाणून
लाईफ स्टाईल

करण जोहरच्या वेट लॉस जर्नीचे सीक्रेट, घ्या जाणून

10
Karan Johar Weight Loss
Karan Johar Weight Loss

Karan Johar Weight Loss : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा केवळ आपल्या चित्रपटांसाठीच नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये करण जोहरच्या लुकमध्ये झालेला बदल सर्वांच्या लक्षात आला. विशेषतः त्याचे वजन कमी झाल्याने तो अधिक फिट, यंग आणि कॉन्फिडंट दिसू लागला आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनमागे एक खास डाएट पद्धती आहे वन डे मील डाएट, ज्याच्या मदतीने त्याने हे यशस्वीपणे साध्य केलं.

काय आहे वन डे मील डाएट?

वन डे मील म्हणजे दिवसातून केवळ एकदाच जेवण घेणे. याला OMAD (One Meal A Day) असंही म्हटलं जातं. हा प्रकार इंटरमिटंट फास्टिंगचा एक भाग आहे. या डाएटमध्ये व्यक्ती 24 तासांपैकी फक्त एका ठराविक वेळेत जेवतो आणि उर्वरित वेळ उपवासात घालवतो. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते, चरबी जळण्याची प्रक्रिया सुरू होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

करण जोहरने OMAD का निवडलं?

करण जोहरने अनेक वर्षं विविध डाएट्स, फिटनेस ट्रेनिंग आणि वर्कआउट्सही केले होते.. पण सततचे शूटिंग, व्यस्त वेळापत्रक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे तो स्वतःसाठी नियमित वेळ देऊ शकत नव्हता. त्यानंतर त्याने आपल्या आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याने वन डे मील डाएटचा अवलंब केला.

त्याला ही पद्धत सोपी वाटली कारण यात त्याला दिवसभर लहान लहान वेळेत खाण्याची गरज नव्हती. त्याऐवजी तो एकदाच भरपेट, पोषणयुक्त आणि हेल्दी जेवण घेत असे. या जेवणात प्रथिने (प्रोटीन), फायबर, हेल्दी फॅट्स आणि काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असायचे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत असतानाच, अतिरिक्त कॅलरीजपासून तो वाचत असे.

Karan Johar Weight Loss
Karan Johar Weight Loss

काय झाले फायदे?

करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले की, OMAD केल्यामुळे त्याच्या शरीरातील सुस्ती कमी झाली, एनर्जी लेव्हल वाढली आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे वजन लक्षणीय प्रमाणात घटले. फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही तो अधिक शांत आणि फोकस्ड झाला आहे.

==============

हे ही वाचा : 

Parenting Tips : घटस्फोटानंतर मुलांचे पालकत्व कसे करावे?

Health Care : कॉस्मेटिकचा अत्याधिक वापर करताय? आधी हे वाचा

===============

फिटनेससोबत मानसिक शांतीही

करण जोहर नेहमीच आपल्या मानसिक आरोग्याविषयी खुल्या मनाने बोलतो. OMAD मुळे त्याला फक्त वजन कमी करायला मदत झाली नाही, तर स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी संधी मिळाली. यामुळे त्याची एकूण जीवनशैली सुधारली.(Karan Johar Weight Loss)

करण जोहरची ही ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी हीच सांगते की, योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध आहारपद्धतीमुळे कोणताही व्यक्ती आपले आरोग्य सुधारू शकतो. वन डे मील ही पद्धत प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही, पण करणसारख्या व्यस्त व्यक्तींसाठी ती एक प्रभावी उपाय ठरली.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....