Home मनोरंजन असे काय घडले की, करण जोहरच्या हातावर असलेली सर्व मेहंदी त्याच्या चेहऱ्यावर गेली पसरली
मनोरंजन

असे काय घडले की, करण जोहरच्या हातावर असलेली सर्व मेहंदी त्याच्या चेहऱ्यावर गेली पसरली

14

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अचानक लगीनगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. बॉलिवूडमधील सर्वात क्युट आणि गाजलेले कपल म्हणून रणबीर आणि आलिया ओळखले जात होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी नेहमीच मोठा बज निर्माण केला होता. मागील जवळपास दोन वर्षांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र विविध कारणांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले गेले. पण १४ एप्रिल २०२२ रोजी या दोघांनी अतिशय जवळच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत खासगी समारंभात लगीनगाठ बांधली आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच जल्लोष झाला. या लग्नामध्ये अतिशय मोजके पाहुणे आमंत्रित होते. या लग्नाचे आता नवनवीन किस्से आणि गंमतीजमती उपस्थित पाहुणे सर्वांना सांगत आहे. 

निर्माता, दिग्दर्शक असलेल्या करण जोहरची मानसकन्या म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. त्यामुळे करण या लग्नाला हजर असणार हे सर्वश्रुत होते. करणने नुकताच आलियाच्या मेहंदी फंक्शनदरम्यान त्याच्यासोबत झालेला एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे. करण जोहर सध्या टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा ‘हुनरबाज’ या शोचे परीक्षण करताना दिसत आहे. या शोमध्ये करणने नुकताच एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. शोचा एक नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण सांगतो की, “आलियाच्या मेहंदी फंक्शनल मी गेलो आणि अतिशय धुमधडाक्यात हे फंक्शन सुरू होते. तिथे असणाऱ्या सर्वच महिलांनी काही पुरुषांनी त्यांच्या हातावर मेहंदी काढली होती. मी देखील माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलियाचे लग्न असल्यामुळे मेहंदी काढायचे ठरवले.”

पुढे करण सांगतो की, “मी हातावर मेहंदी काढली. आम्ही नाचत होतो त्यात मला खूपच घाम आला आणि नकळतच मी माझ्या मेहंदीच्या हातानी माझ्या कपाळावरचा घाम पुसला. मग काय माझ्या हातावरची सर्व मेहंदी माझ्या चेहऱ्यावर पसरली गेली. मला काय करावे समजेचना. चेहऱ्यावर मेहंदी लागल्यामुळे चेहरा लाल होण्याचे मला टेन्शन आले. मग आलियाच्या मेकअप आर्टिस्टने मला मदत केली. त्याने आधी माझ्या चेहऱ्यावरची मेहंदी पुसली आणि मला काही प्रोडक्ट लावले जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर मेहंदीचा रंग चढणार नाही.”

हा किस्सा ऐकून तिथे उपस्थित असणारे सर्वच लोकं जोरजोरात हसत होते. यावर भारती सिंगने देखील त्याची टर खेचत म्हटले, “बरं झाले तुझा चेहरा ठीक झाला नाहीतर तुझ्याकडे पाहून असे वाटले असते की, कोणी पान खाऊन थुंकले आहे.” यावर परिणीती चोप्रा देखील करणची थट्टा करताना दिसली. सध्या हा प्रोमो आणि करण जोहरचा किस्सा खूपच गाजताना दिसत आहे. 

=====

हे देखील वाचा – ओटीटीचा महिमा..
=====

करण आणि आलिया यांचे नाते सर्वांनाच माहित आहे. करणनेच आलियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. त्यानंतर ती करणच्या जवळपास प्रत्येक सिनेमात भूमिका साकारताना दिसली. आता लवकरच ती करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र आदी कलाकार दिसणार आहे.  

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...