Home आरोग्य कंटोला भाजी तुम्हाला आवडते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
आरोग्य

कंटोला भाजी तुम्हाला आवडते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

9
Kantola vegetable
Kantola vegetable

भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यामुळेच आपण आपल्या आहारात विविध पालेभाज्या किंवा फळं भाज्यांचा समावेश करतो. अशातच कंटोलाची भाजी (Kantola vegetable) ही खासकरुन पावसाळ्यात मिळते, ती सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. खरंतर या भाजीचा रानभाज्यांमध्ये समावेश केला जातो. तर कंटोलाची भाजी नव्हे तर त्याची पान सुद्धा औषधी गुणांना समृद्ध असतात. यामुळेच आम्ही तुम्हाला कंटोला भाजीचे फायदे आणि त्याच्या उपयोगांबद्दल अधिक सांगणार आहोत.

कंटोला भाजीचे फायदे
कंटोला ही एक लहान आकाराची काटेदार भाजी आहे. त्याला खारट कारलाच्या नावाने ओळखले जाते. याचे वैज्ञानिक नाव मोमोरडिका डायोइका असे आहे. याची पाने चिकित्सकीय गुणांनी भरपूर असते. लक्षात ठेवा की, याचे सेवन आजारावर उपचार म्हणून वापरले जात नाही, तर त्यापासून दूर राहता येऊ शकते. तर प्रथम जाणून घेऊयात कंटोला भाजीचे फायदे.

-अँन्टिऑक्सिडेंटने भरपूर
कंटोला अँन्टिऑक्सिडेंटने भरपूर असते. तर कंटोला भाजीत फ्लेवोनोइड तत्व असतात जे शक्तिशाली अँन्टीऑक्डिेंटची प्रक्रिया करतात. हे अँन्टिऑक्सिडेंट शरिरात फ्री-रेडिकल्स द्वारे उत्पन्न कोशिकांमुळे होणारे नुकसान थांबवू शकतात. या फ्री रेडिकल्स आणि मुक्त कणांचे प्रमाण जेव्हा अधिक होते तेव्हा हृदय रोग, कँन्सर आणि लिव्हरची समस्या होण्याची जोखिम वाढते.

Kantola vegetable
Kantola vegetable

-अल्सरसाठी कंटोलाचा उपयोग
अल्सरच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी कंटोलाचा उपयोग केला जाऊ शकतो. या विषयावर एका संशोधनात असे म्हटले आहे की, कंटोला भाजीत हाइड्रोअल्कोल अर्कात अँन्टिअल्सर गुण असतात. खरंतर यामध्ये अँन्टिऑक्सिजेंट आणि फ्री रेडिकल्स दूर करणारे अॅसिड कमी करुन अँन्टिअल्सर गुण प्रदर्शित करतात. लक्षात ठेवा, अल्सरच्या उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांशी जरुर संपर्क साधा.

-तापावेळी कंटोला भाजीचे फायदे
ताप कमी करण्यासाठी तुम्ही कंटोला भाजीचा आहारात समावेश करु शकता. कंटोलाच्या मुळाच्या रसात अँन्टिपाएरेटिक गुण असतात. याच्या वापराने ताप कमी करण्यासाठी मदत होते. एका रिसर्चमध्ये लिहिण्यात आले आहे की, सीडेटिव्ह प्रमाण कार्य करते. त्यामुळेच खुप ताप जरी आला असेल तर याच्या मुळाची पेस्ट शरिराला लावल्यास थोडाफार दिलासा मिळतो.

हे देखील वाचा- व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ कोणते? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे

-कँन्सरपासून बचाव करण्यासाठी कंटोलाचा उपयोग
कँन्सर हा एक घातक आजार आहे. यापासून बचाव करण्यासाठी कंटोला काही स्तरापर्यंत फायदेशीर ठरु शकतो. शोधात असे दिसून आले की, कंटोलाच्या अर्कात अँन्टी कँन्सर गुण असतात. रिसर्चनुसार कंटोलाच्या भाजीच्या (Kantola vegetable) अर्काचा वापर केल्यास ५० टक्क्यांपर्यंत कँन्सर सेल्स नियंत्रित केला जाऊ शकतो.

-टाइप-२ मधुमेहसाठी कंटोलाचे फायदे
रक्ताच्या ग्लुकोजचा स्तर वाढल्यास मधुमेहची समस्या होऊ शकते. यामध्ये काही स्तरापर्यंत बचाव करण्यासाठी कंटोलाची फायदेशीर होऊ शकते. कंटोलात अंन्टिडायबिटिक आणि हाइपोग्लाइसेमिक प्रभाव असतात. कंटोलाचे हे गुण रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्यासह नियंत्रित करण्यास मदत करु शकते. अशातच टाइप-२ मधुमेहापासून बचाव करण्यासाठी आहारात कंटोलाच्या भाजीचा समावेश केला जाऊ शकतो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...