Home लाईफ स्टाईल Kamika Ekadshi: कामिका एकादशी एकादशीचे महत्व आणि माहिती
लाईफ स्टाईल

Kamika Ekadshi: कामिका एकादशी एकादशीचे महत्व आणि माहिती

35
Kamika Ekadshi

हिंदू धर्मात एकादशी या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. एकादशीचा दिवस म्हणजे विष्णू पूजेचा दिवस. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. एका वर्षात २४ एकादशी येतात आणि या प्रत्येक एकादशीचे खास महत्व असते. आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. सृष्टीचे पालनहार असलेल्या श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीला केल्या जाणाऱ्या व्रताला विशेष महत्त्व आहे. (Marathi News)

कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी असून या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते असे आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे. यावर्षी कामिका एकादशी सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्यात साजरी होणारी ही दुसरी एकादशी आहे. आषाढातच कामिका एकादशी असते. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, शिवाय पूर्वजन्मी केलेल्या पापांपासून सुद्धा या एकादशीच्या व्रतामुळे मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. (Kamika Ekadashi)

कामिका एकादशी यंदा २१ जुलै रोजी असणार आहे. एकादशी ही तिथी २० जुलैला दुपारी १२ वाजून १४ मिनिटांनी सुरू होत आहे. परंतु, उदय तिथीमध्ये आपण सर्व सणवार साजरे करत असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ जुलैला कामिका एकादशी व्रत पाळले जाणार आहे. त्याच वेळी, द्वादशी तिथी मंगळवार, 22 रोजी सकाळी ७.०६ पर्यंत राहील. मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य योनी प्राप्त होते. जो व्यक्ती क्रमिक एकादशीच्या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो, त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते. असे सांगितले जाते की, जी व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णू समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावते तिचे पित्र स्वर्गलोकात जातात. पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने नक्कीच केले पाहिजे. (Todays Marathi Headline)

कामिका एकादशी व्रत कसे करावे?
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत होऊन स्नान करून सोवळ्यात व्हावे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या प्रतिमेला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर देवाला गंध,अक्षता, फुल अर्पण करावे. धूप-दीप लावून आरती करावी. त्यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. मात्र लक्षात ठेवा देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुळस नक्कीच टाकावी. नैवेद्य दाखवल्यानंतर शेवटी विष्णू सहस्त्रनामचा पाठ अवश्य करावा.(Marathi Latest News)

Kamika Ekadshi

कामिका एकादशीच्या दिवशी काहीही खाऊ नये. यादिवशी उपवास करावा. या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता, पाणी पिताना पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकून प्यावे. रात्री जागरण करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. ब्राह्मणांना यथाशक्ती भोजन द्यावे, दान दक्षिणा द्यावी. त्यानंतर तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा. (Top Marathi News)

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते. कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे, तुळशीला जल अर्पण करणे आणि तुळशीच्या माळेने जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कामिका एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात, असे मानले जाते. (Top Marathi News)

कामिका एकादशी कथा

पौराणिक मान्यतेनुसार एका गावात शूर क्षत्रिय ब्राह्मण राहात होता. काही कारणामुळे एकेदिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले. आणि त्या भांडणात तो मरण पावला. त्या क्षत्रियाला स्वत:च्या हाताने त्या ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करायचे होते. पण इतर पंडितांनी त्यांना असे करण्यास मनाई केली. त्यांनी सांगितले की, तुम्ही ब्राह्मणाच्या हत्येचे दोषी आहात. या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि या पापातून तुम्हाला मुक्त व्हावे लागेल. (Social Updates)

===============

हे देखील वाचा :  Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

===============

यावर त्या क्षत्रिय ब्राह्मणाने विचारले की, या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे? तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की, आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला भगवान श्रीधरांचा भक्तिभावाने उपवास करुन, ब्राह्मणांना भोजन दिल्यास आणि दक्षिणा दिल्याने आशीर्वाद प्राप्त होतो तसेच पापातून मुक्ती मिळते. क्षत्रिय ब्राह्मणाने या रात्री भगवान श्रीधरांची उपासन केली आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापतून मुक्तता केली असे म्हटले जाते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....