आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरातील जगप्रसिद्ध अंबुबाची जत्रा सुरू झाली आहे. या जत्रेच्या काळात मंदिराचे दरवाजे 3 दिवस बंद करण्यात येतात. मात्र असे असले तरी, कामाख्या देवी मंदिर परिसरात हजारो भाविक उपस्थित असतात, आणि देवीची आराधना करतात. या दिवसात देवीला मासिक पाळी आल्याचे सांगण्यात येते. देवीच्या मासिक पाळीचा हा उत्सव स्त्री शक्तीचे प्रतिकही मानण्यात येतो. मान्यतेनुसार, या काळात मंदिराजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीचे पाणी तीन दिवस लाल रंगाचे होते. गुवाहाटी येथे असलेले हे कामाख्या देवी मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराशी संबंधित अनेक रहस्य असून त्यापैकी एक म्हणजे, अंबुवाची जत्रा आहे. या जत्रेच्या काळात जगभरातील देवीचे भक्त मंदिर परिसरात येतात, आणि धार्मिक अनुष्ठान करतात. 26 जून पर्यंत कामाख्या देवीचा अंबुबाची मेळा होणार असून यासाठी देशभरातले तात्रिंक उपासकही देवीच्या मंदिर परिसरात आले आहेत. (Ambuba Yatra)

गुवाहटीमधील माता कामाख्या मंदिरात अंबुबाची जत्रा सुरु झाली आहे. 26 जूनपर्यंत हा मातेचा उत्सव सुरु रहाणार आहे. या काळात मातेला मासिक धर्म येतो, आणि तिच्या विश्रांतीसाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, अशी मान्यता आहे. देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माता कामाख्या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार माता सती आपल्या वडिलांच्या, राजा दक्ष यांच्या महालातील यज्ञात सहभागी होण्यासाठी आली होती. (Latest News)
मात्र राजा दक्ष यांनी माता सतीचा अपमान केला, शिवाय भगवान शंकरांचाही अपमान केला. आपल्यामुळे महादेवाचा अपमान झाला, हे देवी सहन करु शकली नाही. तिनं आपले शरीर अग्नीच्या कुंडात अर्पण केले. या घटनेनं भगवान शंकराचा संताप झाला. त्यांनी माता सतीचा मृतदेह धरुन तांडव नृत्य सुरु केले. यामुळे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जिथे जिथे सती मातेचे अवयव पडले, तिथे आज शक्तीपीठांची स्थापना झाली आहे. माता सतीची योनी आसाममधील गुवाहाटी येथील कामागिरी येथे पडली. तिथेच कामाख्या देवी मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराबाबत अनेक रहस्य आहे. या मंदिरात अनेक धार्मिक विधी होतात. मात्र हे मंदिर स्त्री शक्तीचे प्रतिक मानले जाते. याच मंदिरातील अंबुबाची जत्रेला देशभरातील तांत्रिक मंदिर परिसरात हजर असतात. या शिवाय मातेचे भक्तही भारतातून आणि परदेशातून या जत्रेसाठी येतात. (Ambuba Yatra)

हा काळ आईचा विश्रांतीचा काळ मानला जातो. या काळात कामाख्या देवी मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जातात. या 3 दिवसात देवीची पूजा होत नाही. शिवाय देवीचे दर्शनही दिले जात नाही. चौथ्या दिवशी पारंपारिक पूजाविधीनंतर मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले केले जातात. या मंदिरात मिळणारा प्रसादही खूप खास आहे. देवीच्या या विश्रांतीच्या काळात मंदिराच्या गर्भगृहात देवीजवळ एक पांढ-या रंगाचे कापड ठेवले जाते. मंदिराचे दरवाजे खुले झाल्यावर देवीजवळचे हे कापड लाल झाल्याचे आढळून येते. हेच कापड भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. यामुळे सुख, समृद्धी यांचे वरदान लाभते, अशी मान्यता आहे. या अंबुबाची जत्रेसाठी देवीचे मंदिर सजवण्यात आले आहे. तीन दिवसानंतर जेव्हा मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले कऱण्यात येतील तेव्हा येथे लाखो भाविक उपस्थित असतात. या भाविकांच्या सुविधेसाठी येथे प्रशासनानं विशेष कक्ष सुरु केले आहेत.
अंबुबाची जत्रा भरल्यावर अनेक भाविक देवीचा तीन दिवसांचा उपवासही करतात. यामागे अनेक धार्मिक मान्यता आहेत. याशिवाय येथील स्थानिक या तीन दिवसात कुठलेही शेतीचे काम करीत नाहीत. देवीसाठी हा तीन दिवसांचा विश्रांतीचा काळ असतो. या तीन दिवसात कुठलेही खोदकाम केल्यास त्याच्या आवाजाचा त्रास देवीला होईल, त्यामुळे या सर्व भागात अंबुबाची जत्रा भरल्यापासून शेतीचे कुठलेही काम करण्यात येत नाही. देवीची आराधना करत या काळात उपवास केला जातो. त्यात कंदमुळे खाल्ली जात नाहीत. पृथ्वीला आईप्रमाणे विश्रांती दिली जाते, म्हणून, मुळा, गाजर, पालक, मेथी अशा भाज्या जमिनीतून उपटल्या जातात, त्या खाणे टाळले जाते. देवीचे भाविक या तीन दिवसात अत्यंत साधे अन्न सेवन करतात. देवीचा हा विश्रांती काळ देवीच्या भाविकांचीही परीक्षा बघणारा असतो. (Latest News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- 51 Shakti Peethas
- aarati
- Ambuba Yatra :
- America
- Assam
- BJP
- Brahmaputra river
- Carrot
- china
- congress
- dharmik
- donald trump
- Entertainment
- fenugreek
- Guwahati
- india
- information
- International news
- Kamakhya Temple
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Lord Shankar
- Lord Vishnu
- mahaarti
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi Movie
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- radish
- raja daksh
- Social News
- Spinach
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण