Home मनोरंजन ‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी
मनोरंजन

‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी

7

‘चंद्रमुखी’ या आगामी चित्रपटातील गाण्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चित्रपटातील चंद्रा गाणं तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गाजतय. यातच या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. आपल्या दिलखेचक अदांनी, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळतेय.

यापर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका  बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालतोय.

====

हे देखील वाचा: स्नेहल तरडे साकारणार “सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते”

====

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक याविषयी सांगतात की,  ‘’या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.’’ 

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.  

====

हे देखील वाचा: “तिरसाट” चित्रपट २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

====

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...