Home आंतरराष्ट्रीय Israel And Iran War : अमेरिकेच्या हल्ल्याने जगभरात चिंता !
आंतरराष्ट्रीय

Israel And Iran War : अमेरिकेच्या हल्ल्याने जगभरात चिंता !

12
Israel And Iran War

इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने, हो नाही करता उडी घेतली आहे. इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुतळांवर अमेरिकेनं बी 2 बॉम्बर विमानांनी हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या इराणवरील हल्ल्याचे अवघ्या जगावर परिणाम झाले आहेत. या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला धडा शिकवणार अशी धमकी दिली आहे. तर दुसरीकडे रशियाच्या संरक्षण अधिका-यांनी इराणला कुठलाही देश परमाणु बॉम्ब द्यायला तयार आहे, असे सांगून या युद्धाची परिणिती परमाणु युद्धात होणार असल्याचे सूचित केले आहे. अमेरिकेनं इराणवर केलेल्या या हल्ल्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत मोठे युद्ध होणार असून त्यातून होणा-या विनाशाला अमेरिका कारणीभूत असेल, अशी टीकाही अमेरिकेवर करण्यात येत आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेल्या इस्रायल इराण युद्धात अमेरिकेची अचानक एन्ट्री झाली आणि अवघ्या जगभरात आश्चर्य आणि चिंताही व्यक्त करण्यात आली. (Israel And Iran War)

वास्तविक या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ही कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशीच राहिली आहे. इराणनं इस्रायलच्या हॉस्पिटल आणि रहिवासी विभागात हल्ले सुरु केल्यावर इस्रायलनं अमेरिकेकडे अपेक्षेनं पाहिलं होतं. तेव्हा याबाबत भूमिका घ्यायला पंधरा दिवसांचा अवघी लागेल, असे विधान करुन ट्रम्प यांनी तात्पुरता विराम घेतला होता. मात्र अचानक त्यांनी इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुतळांवर हल्ले केल्यामुळे आता हे युद्ध भिषण होणार असल्याचे चित्र आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्षात अमेरिका थेट सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेने इराणवर ही पहिलीच थेट लष्करी कारवाई केली आहे. (International News)

या सर्वांवर जगभरातून आलेल्या प्रतिक्रीयांमधून अमेरिकेवर टीका करण्यात आली आहे. अगदी अमेरिकेचा गेल्या काही दिवसातला सख्खा मित्र झालेल्या पाकिस्तानंही अमेरिकेवर या हल्ल्यांमुळे टीका केली आहे. कायम इराणच्या बाजुनं उभे रहाणा-या चीननं अमेरिकेला 2003 च्या इराक युद्धातील निर्णयाची आठवण करुन दिली आहे. अमेरिकेचा हा निर्णयही त्यांच्याच अंगलट येणार असल्याचे चीननं सांगितलं आहे. या हल्ल्यावर पाकिस्तानची भूमिका आश्चर्यकारक आहे. कारण या हल्ल्यासाठी पाकिस्तानची इराणला मोठी मदत झाल्याची माहिती असतांना पाकिस्तानने अमेरिकन हल्ल्याचा निषेध केला असून हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचे सांगितले आहे. अर्थात याच पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणीही केली आहे. (Israel And Iran War)

या सर्वात सौदी अरेबियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सौदीनं या हल्ल्याचा निषेध करत, आंतरराष्ट्रीय कायद्याचे अमेरिकेनं उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे. जपानमध्येही या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. हा प्रश्न इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चेच्या माध्यमातून सोडवावा अशी मागणीही जपाननं केली आहे. तर अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर दक्षिण कोरियामध्ये आपत्कालीन बैठक झाली. दक्षिण कोरियावर या हल्ल्याचा परिणाम होणार नाही. मात्र अमेरिकेची यातील भूमिका ही हुकूमशाही पद्धतीची असल्याची टीकाही केली आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढल्यावर ऑस्ट्रेलियाने तेहरानमधील आपला दूतावास बंद केला आहे. इराणचे अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी सांगितले आहे. (International News)

===============

हे देखील वाचा : Farah Pahlavi : इराणची शेवटची सम्राज्ञी !

Israel And Iran : पक्के मित्र असलेले इस्रायल आणि इराण शत्रू का झाले !

================

सध्याची इऱाणमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे, अशा परिस्थितीत फक्त चर्चेतून मार्ग निघू शकेल, असेही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी सांगितले आहे. कतार आणि ओमानने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमधील जीवनमान अस्थिर झाल्याचेही या दोन देशांकडून सांगण्यात आले आहे. लेबनॉनने, अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने प्रादेशिक संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. ब्रिटनने इराणला हे संकट राजनैतिक पद्धतीने सोडवण्याचे आवाहन केले. इराणचा अणुकार्यक्रम जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतो. इराणला कधीही अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही आणि अमेरिकेने तो धोका कमी करण्यासाठी अमेरिकेनं उचललेले पाऊल योग्य असल्याचेही ब्रिटनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तर येमेनमधील हमास आणि हुथी बंडखोरांनी अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या आक्रमणाविरुद्धच्या लढाईत इराणला हुथींनी पाठिंबा दिला आहे. (Israel And Iran War)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...