Home मनोरंजन ‘द मास्क’ फेम जिम कैरी याच्या निवृत्तीचा विचार खरा की चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग?
मनोरंजन

‘द मास्क’ फेम जिम कैरी याच्या निवृत्तीचा विचार खरा की चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग?

9
Jim Carrey

‘द मास्क’ या चित्रपटानं जगभरात ओळखला जाणारे हॉलिवूडस्टार जिम कैरी (Jim Carrey) यांनी हॉलिवूडला अलविदा करणार असल्याचे जाहीर केले आहे. साठ वर्षाचे जिम कैरी हे उत्तम अभिनेते आहेतच मात्र लेखक, दिग्दर्शक म्हणूनही जिम ओळखले जातात. त्यामुळे आपला हा लाडका अभिनेता आता अभिनयला रामराम केल्यावर दिग्दर्शनामध्ये पूर्ण वेळ देणार की लेखकाच्या भूमिकेत जाणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

जिम कैरी (Jim Carrey) यांची नुकतीच एक मुलाखत झाली. त्यात त्यांनी याबाबत खुलासा केला आणि चाहत्यांना धक्का दिला. अभिनयापासून मला दूर जायचे आहे, समजा एखादा देवदूत आला आणि त्यांनी सोन्याच्या अक्षरात लिहिलेली स्क्रिप्ट माझ्या हातात दिली, तर मी पुनःविचार करेन, अन्यथा अभिनयपासून दूर जाण्याचा माझा विचार पक्का आहे”, असे जिम यांनी या मुलाखती दरम्यान सांगितले.

जिम कैरी (Jim Carrey) यांनी यापुढे आपल्याला शांतपणे आयुष्य जगायचे आहे. मी भरपूर काम केले असून जीवनाकडे बघायलाही वेळ नव्हता. पण मला आता माझे आयुष्य नव्यानं पहायचंय.” ‘द मास्क फेम’ अभिनेत्यानं असं विधान केल्याने त्याचे चाहतेही बुचकाळ्यात पडले आहेत.

Jim Carrey reacts to Paul Dano's Riddler in The Batman: It's not my kind of  thing | PINKVILLA

====

हे देखील वाचा: कीवमध्ये रशियन हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यु

====

काहींना जिमची ही रिटायर्ड होण्याची घोषणा म्हणजे आगामी चित्रपटाचे हटके प्रमोशन असल्याचे वाटत आहे. जिमचा सॉनिक:द हेजहॉग 2 हा चित्रपट 8 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे जिमनं ही घोषणा करुन चाहत्यांना भावनिक आवाहन केल्याचा कयासही व्यक्त होतोय.

ब्रूस ऑलमाइटी, द मास्क, द केबल गाय, हाउ द ग्रिंच स्टोल क्रिसमस, द ट्रूमैन शो, इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड असे एकापेक्षा एक हिट चित्रपट जिम यांनी दिले आहेत. द ट्रूमैन शो आणि मैन ऑन द मून यासाठी जिम यांना दोनवेळा गोल्डन ग्लोब या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अभिनयासोबत जिम कैरी (Jim Carrey) लेखकही आहेत.1990 मध्ये ‘इन लिव्हिंग कलर’ या अमेरिकन दूरदर्शनवरील मालिकेच्या माध्यमातून जिम यांना प्रथम ओळख मिळाली. त्यानंतर या गुणी अभिनेत्यांने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

Fans Are Not Pleased With Jim Carrey's Predatorial Joke Against Female  Journalist

====

हे देखील वाचा: वाढदिवसानिमित्त रश्मिकाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

====

‘द मास्क’ या चित्रपटानं जिम कैरी (Jim Carrey) हे हॉलिवूडमधले ब्रॅन्ड झाले. 2013 मध्ये त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. हाऊ रोलँड रोल्स नावाची लहान या कथेला गेलेट बर्गेस चिल्ड्रन्स बुक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

2020 मध्ये जिम यांची कादंबरी Memoirs and Misinformation प्रकाशित झाली आहे. आता जिम यांची घोषणा खरी आहे की त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन हे लवकरच समजणार आहे.

  • सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...