Home क्रीडा आयपीएल टीम्सचे मालकी हक्क आणि आर्थिक नफा- तोटा
क्रीडा

आयपीएल टीम्सचे मालकी हक्क आणि आर्थिक नफा- तोटा

11
ipl 21 | K Facts

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) : संघ रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या मालकीचा असून मुकेश अंबानी हे त्याचे हेड आहेत. तर मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या संघाचे काम पाहतात.

किंग्स एलेवन पंजाब (Punjab Kings) : अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यासोबतच या संघाचे सहमालक म्हणून करण पॉल यांचे नाव सुध्दा घेतले जाते.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) : केकेआर नावाने ओळखला जाणारा हा संघ अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री जुही चावलाचा पती जय मेहता हे यांच्या मालकीचा आहे.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) : आयपीएलमध्ये दोन वेळा विजेता ठरलेला हा संघ बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व सिंमेट इंडिया कंपनी यांच्या मालकीचा होता. परंतू आता तो चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या मालकीचा आहे.

IPL 2021
IPL 2021

रॉयल चॅलेंजर बंगळुरू (Royal Challengers Bangalore) : चा संघ उद्योगपती विजय माल्या यांच्या मालकीचा असून मुकेश अंबानी यांनी नंतर सर्वात जास्त बोली लावून खेळाडू खरेदी केले आहेत.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) : हा संघ अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या मालकीचा असल्याची चर्चा असली तरी खरा मालक मनोज बडाले हा आहे. तसेच लॅक्लन मर्डोक आदित्य चेल्लारम आणि सुरेश चेल्लारम यांची सुध्दा यामध्ये भागीदारी आहे.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) : हा संघ हैदराबाद स्थित असलेल्या सन टिव्हीने खरेदी केला असून कलानीधी मारन या कंपनीचे मालक आहेत.दिल्ली डेअरडेव्हिल्स : हा संघ जीएमआर ग्रुप कंपनीच्या मालकीचा असून या कंपनीचे मालक जी एम राव हे आहेत.

IPL 2021
2021 Indian Premier League

बीसीसीआयची (Board of Control for Cricket in India) ही व्यावसायिक क्रिकेट लीग २००८ मध्ये सुरु झाली. आजपर्यंत या लीगचे एकूण १२ हंगाम झाले आहेत. या लीगमध्ये सध्या ८ संघ सहभागी होतात. यात देशातील तसेच परदेशातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. ही लीग जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. मार्च ते मे महिन्यांच्या दरम्यान ही लीग खेळवली जाते. सरासरी ३५ हजार लोक आयपीएलचा प्रत्येक सामन्याला हजेरी लावतात. एका हंगामात अंदाजे ३५ लाख लोक या लीगचा आनंद प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन घेतात.

या लीगची (IPL) ब्रॅंड व्यॅल्यु २०१८ मध्ये ६.३ बिलीयन डॅालर होती. तब्बल ८० कोटी रुपये हे प्रत्येक आयपीएल संघ आपल्या खेळाडूंना मानधनापोटी देतो. याचमुळे जवळपास ६९० कोटी रुपये दरवर्षी खेळाडूंच्या मानधनावर खर्च होतात. १६ हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीला बीसीसीआयने ५ वर्षांचे प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स इंडियाला विकले आहेत. आयपीएलच्या (Indian Premier League) इतर आर्थिक उलाढाली तर करोडोंच्या घरात आहेत. लिलाव वेगळे. असो पण आता कोरोनाच्या धुमश्चक्रीत संपूर्ण देश होरपळतोय… तरीदेखील आयपीएलचं (IPL 21) ग्लॅमर किंचीतही कमी झाले नाही.

  • शब्दांकन- शामल भंडारे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

India
क्रीडा

India : भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळाच का असतो?

नुकताच आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला आहे. दोन...

Cricket | International News
क्रीडा

Cricket : ‘या’ आहेत सर्वांत श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Cricket
क्रीडा

Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

यंदा देखील २ तारीख भारतासाठी लकी ठरली. २०११ साली २ एप्रिलला रचल्या...