अखेर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवलाच. तब्बल १७ वर्षांपासून असणारी प्रतीक्षा अखेर संपली आणि आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपद पटकावले. ही टीम, या टीमचे प्रशंसक, खुद्द विराट कोहली देखील या विजयासाठी आसुसला होता. १७ वर्षांच्या मोठ्या कालखंडामध्ये आयपीएलमधील अनेक टीमने एकापेक्षा अधिक वेळा अंतिम सामना जिंकत त्या त्या पर्वाचे जेतेपद मिळवले होते. मात्र आरसीबीला हे कधीच शक्य झाले नाही. २०२५ मात्र आरसीबीसाठी हा इतिहास बदलवणारे ठरले. एवढ्या वर्षांचा दुष्काळ संपला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या १८ व्या सीझनचे विजेतेपद मिळवले आहे. हा विजय सर्वांसाठीच खास ठरला. (IPL)
३ जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स असा अंतिम सामना रंगला. या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर ६ धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहलीने अनेक वर्ष ही ट्रॉफी जिंकण्याचे पाहिलेले स्वप्नही पूर्ण झाले. आरसीबीने पंजाबसमोर १९१ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला ७ विकेट्स गमावून १८४ धावा करता आल्या. दरम्यान आरसीबीने चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला आहे.(Marathi News)

विराटच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट खूपच भावुक झाला. त्याच्या डोळ्यांत आनंद अश्रू तरळले आणि विजायनंतर तो मैदानावरच रडू लागला. त्याला पाहून सर्वच प्रेक्षक देखील भावूक झाले होते. आरसीबीच्या या विजयामुळे मैदानावर उपथित असलेली विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा खूपच खुश होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता. (Top Stories)
अनुष्का विराटचे जवळपास सर्वच सामने पाहण्यासाठी मैदानावर कायम उपस्थित असते. या सामन्यात देखील ती हजर होती. विजयानंतर अनुष्का विराटला भेटायला मैदानावर आली तेव्हा विराटने अनुष्काला मिठी मारली आणि तो रडू लागला. एवढंच नव्हे तर आरसीबी जिंकल्यानंतर अनुष्काच्या डोळ्यातही अश्रू होते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. (Todays Top Headline)
या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. सोबतच त्याने मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर शूट केलेले काही फोटोही पोस्ट केले आहेत. विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले. “या संघाने ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न साकार केले, हा सीझन मी कधीही विसरणार नाही. मागील अडीच महिन्यांतील या प्रवासाचा आम्ही पूर्ण आनंद घेतला. हा विजय, ही ट्रॉफी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी वाईट काळातही आमची साथ कधीच सोडली नाही. (Latest Marathi Headline)
===============
हे ही वाचा :
Jonas Masetti : भारताचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री मिळवणारे जोनास मसेट्टी आहेत तरी कोण?
Ramdas Marbade : पाणीपुरी विकणार्या रामदास मारबदेची उत्तुंग भरारी; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड
================
ही ट्रॉफी एवढ्या मोठ्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. टीम म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे. या आयपीएल ट्रॉफीबद्दल मी काय बोलू…, मित्रा, ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू १८ वर्षं वाट पाहायला लावलीस. मात्र या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद हा खरोखरच अनोखा आहे.” या पोस्टसोबत विराटने हार्ट, ट्रॉफीची इमोजी देखील टाकली आहे. (Marathi Latest News)
- ab devilliers
- ahemdabad
- Anushka Sharma
- BCCI
- Chennai Super Kings
- cricket
- cricket lovers
- csk
- Dhoni
- Gujrat
- ICC
- india
- Indian Cricket
- indian cricket team
- ipl
- IPL 18
- ipl final
- k l rahul
- king kohli
- kkr
- kohli
- mi
- ms dhoni
- mumbai indians
- narednra modi stadium
- priety zinta
- Punjab Kings
- rcb
- rcb fans
- Rohit Sharma
- Royal Challengers Bangalore
- royalchallengersbangalore
- team india
- virat
- Virat Kohli
- viratians
- अहमदाबाद
- आयपीएल १८
- आयपीएल अंतिम सामना
- आरसीबी
- क्रिकेट
- गुजरात
- नरेंद्र मोदी स्टेडियम
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- विराट कोहली
- विराट कोहली पोस्ट