येत्या २१ जून रोजी संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या योग दिनाची सर्वत्र जोरदार तयारी चालू आहे. महर्षी पतंजली यांना योगाचे जनक म्हटले जाते. आजच्या काळात तर योग ना केवळ आपल्यला तंदरुस्त बनवते तर अधिक स्फूर्तिदायक आणि आनंदी ठेवण्याचे काम देखील योगामुळे शक्य होते. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी योग खूपच महत्वाचा आहे. प्रत्येकाने दररोज न चुकता काही सोपे योगासने जरी केले तरी आपले जीवन अधिक आनंदी आणि सकारात्मक होईल. (Yoga Day)
भारताने जगाला दिलेले वरदान म्हणजे ‘योग’. अधिक योग केवळ भारतातच ओळखला जायचा. मात्र हळूहळू या योगाची ख्याती, महत्व जगाला समजू लागले आणि योग परदेशातही लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. आपल्या आयुष्यातील योगाचे महत्व ओळखूनच २०२४ सालापासून जागतिक योग दिनाची सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने २१ जून हा योग दिन आता संपूर्ण जगात साजरा केला जातो. (Marathi News)
योग्य व्यायाम, योग्य श्वासोच्छ्वास, योग्य विश्रांती, योग्य आहार, सकारात्मक विचार आणि ध्यान या पंचसूत्रीवर योग आधारित आहे. दररोज योगासनांचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, रक्तदाब कमी होतो, वजन कमी होते, हृदयविकारांचा धोका कमी होतो, सांधेदुखी कमी होते आदी अनेक शारीरिक फायदे योगामुळे आपल्याला मिळतात. (Todays Marathi Headline)
योग केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक फायदे देखील भरपूर होतात. ताण-तणाव कमी होतो, चिंता कमी होते, एकाग्रता वाढते, शांत झोप लागते, आत्मविश्वास वाढतो, शांत आणि स्थिर मन, आत्म-जागरूकता, सकारात्मक दृष्टीकोन, आदी अनेक फायदे होतात. यंदाच्या योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने दररोज योग करण्याचा दृश्य निश्चय केला पाहिजे. आणि काही सोपे, फायदेशीर आणि लवकर होतील अशी असणे देखील केली पाहिजे. आपण जाणून घेऊया दररोज कोणती सोपी आणि साधी आसने केली पाहिजे. (Top Marathi Headline)

सूर्य नमस्कार
सूर्य नमस्कार हा 12 वेगवेगळ्या स्टेप्सने बनलेले आहे. हे एक-एक करून केले जाते. यामुळे शरीर उबदार होते, रक्ताभिसरण सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
ताडासन
सरळ उभे राहून दोन्ही हात वरच्या बाजूला उचलून पायाच्या बोटांवर समतोल ठेवावा. या आसनामुळे शरीराची मुद्रा सुधारते, पाठीचा कणा मजबूत होतो आणि शरीर लवचिक होते.
भुजंगासन
पोटावर झोपा आणि आपले हात खांद्याजवळ ठेवा आणि हळूहळू शरीराचा वरचा भाग वर करा. या आसनामुळे पाठीचे स्नायू बळकट होतात, पाठीचा कणा लवचिक होतो आणि ताण कमी होतो.
वृक्षासन
नमस्काराच्या मुद्रामध्ये एक पाय दुसऱ्या गुडघ्याजवळ ठेवून हात वरच्या बाजूला जोडून समतोल साधावा. यामुळे संतुलन आणि एकाग्रता वाढते. त्याचबरोबर यामुळे पायाचे स्नायू बळकट होतात आणि शरीराला स्थैर्यही मिळते.
शवासन
पाठीवर झोपा आणि संपूर्ण शरीराला आराम द्या आणि दीर्घ श्वास घ्या. असे केल्याने मानसिक ताण येतो, ताण कमी होतो आणि शरीराला पूर्णआराम ही मिळतो. त्यामुळे आपल्या दिनक्रमात योगा करण्याची सवय लावा.
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन योगचे सर्वात महत्त्वपूर्ण आसन आहे. योगाची सुरूवात करणाऱ्यांसाठी हे सर्वात सोपे आसन आहे. अधोमुख श्वानासनामुळे अनेक आजार दूर राहतात. ताण, तणाव, नैराश्य, अनिद्रासारखे आजारही यामुळे दूर राहतात.
सुखासन
एकावर एक मांडी ठेऊन सरळ बसा आणि त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. या मुद्रेमध्ये तुम्ही राहिल्यानंतर मनःशांती मिळण्यास मदत होते. एकाग्रता अधिक वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय पाठीच्या मणक्यालाही आराम मिळतो. (Marathi Trending News)
वृक्षासन
या आसनामध्ये शरीर संपूर्ण स्ट्रेच होते. सरळ उभं राहून डावा पाय उजव्या पायावर ठेवा आणि शरीराला एका पायाने आधार द्या. हात वर घेऊन सरळ रेषेत जोडा. यामुळे शरीराला संपूर्ण व्यायाम मिळते. दुसऱ्या पायानेही असंच करा.
=========
हे देखील वाचा : June : 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो?
Yoga Day : २१ जूनलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय योग दिवस ?
=========
वज्रासन
नुकतेच योग करायला सुरू केले असेल तर वज्रासन सोपे आसन आहे. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर नक्की हे आसन करा. दोन्ही पाय मागच्या बाजूला ठेऊन त्यावर बसा आणि मांड्यांनी पाय दाबा. त्यानंतर या पोझिशनमध्ये बसा आणि डोळे बंद करून ध्यानधारणा करा. (Social News)
त्राटक
यामध्ये, डोळे मिचकावल्याशिवाय एकाच बिंदूकडे पाहिले जाते. यामुळे एकाग्रता वाढते, चिंता कमी होते आणि मन स्थिर होते. योगानंतर त्राटक केल्याने शरीर आणि मन यांच्यात खोल संबंध निर्माण होतो. यामुळे एकाग्रता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो.
- easy yoga for every day
- easy yogasane
- fitness
- fitness motivation
- gym
- healing
- health
- healthy lifestyle
- International yoga day
- international yoga divas
- Love
- marathi
- meditation
- Mind fulness
- motivation
- namaste
- Nature
- self care
- wellness
- workout
- Yoga
- yoga challenge
- Yoga Day
- yoga every day
- yoga every where
- yoga girl
- yoga inspiration
- yoga journey
- yoga life
- yoga love
- yoga pose
- yoga practice
- yoga teacher
- आंतरराष्ट्रीय योग दिवस
- आरोग्य
- दररोज करण्याची योगासने
- निरोगी आरोग्य
- मानसिक आरोग्य
- योग आणि शरीर
- योग दिन
- योग दिवस
- शारीरिक आरोग्य