Home मनोरंजन हृतिक रोशन आणि सुजेन खान आले एकत्र!, मुलांसोबत घेतला लंचचा आनंद 
मनोरंजन

हृतिक रोशन आणि सुजेन खान आले एकत्र!, मुलांसोबत घेतला लंचचा आनंद 

8
Hrithik Roshan
Hrithik Roshan

बॉलिवूडमधील सर्वात हँडसम आणि गुडलुकिंग अभिनेता म्हणून नेहमीच पहिले नाव प्रत्येकाच्या तोंडावर येते ते ‘हृतिक रोशन (Hrithik Roshan). हृतिकने ना केवळ आपल्या लुक्सने तर आपल्या अभिनयाने, दमदार ॲक्शनने, तुफान डान्सने सर्वांनाच वेड लावले आहे. कोट्यवधी फॅन फॉलोविंग असणारा हृतिक बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जातो. नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये चर्चेत असणारा हृतिक अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक गाजत असतो. 

आता पुन्हा एकदा हृतिक (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक कारणामुळेच एकदा प्रकाशझोतात आला आहे. बॉलिवूडमधील सर्वात मोठे आणि आदर्श जोडपे म्हणून हृतिक आणि सुजेन यांच्याकडे पाहिले जायचे, मात्र या दोघांनी अचानक घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. वैयक्तिक कारणावरून झालेला हा घटस्फोट विविध कारणांनी मीडियामध्ये गाजला. मात्र घटस्फोटानंतरही केवळ आपल्या मुलांसाठी हृतिक आणि सुजेन अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात.

आपल्या दोन्ही मुलांसाठी हृतिक आणि सुजेन नेहमीच ट्रीपला जातात, त्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होतात. त्यांचे अनेकदा विविध फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतात. आता नुकतेच या चौघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट केले गेले. हृतिक (Hrithik Roshan) आणि सुजेन यांना रिदान आणि रेहान नावाची दोन मुलं आहेत. या चौघांनी मिळवून रिदानचा १४वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

हा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे चौघं जण लंचला गेले होते. तेव्हा पापरझीनी त्यांना त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे. यावेळी हृतिकने (Hrithik Roshan) काळया रंगाचा टीशर्ट आणि डेनिम पँट घातली होती, तर सुजेन पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा टीशर्ट आणि निळी जीन्स घातली होती. दोघेही त्यांच्या गाडीकडे जात असताना मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले.

सुजेनने देखील रिदानच्या नावाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. तिने त्यात लिहिले की, “बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू असेच यश मिळवत आयुष्यात पुढे जा. मी खूप नशीबवान आहेस की तू मला आई म्हणून निवडले.” यासोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात रिदानचे अनेक फोटो एकत्र केलेले दिसत आहे. सुजेनच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रिदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

=======

हे देखील वाचा – अखेर जीवनाच्या अवतीभोवती फिरणारी आमिर खानची ‘कहाणी’ आली सर्वांसमोर 

=======

घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुजेन आपल्या मुलांसाठी नेहमी एकत्र येतात. ते अनेकदा सुट्ट्यांसाठी जातात. घटस्फोटानंतर सुजेनदेखील तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे, तर हृतिक देखील त्याच्या आयुष्यात खुश आहे. सध्या हृतिकचे नाव सबा आजादसोबत जोडले जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. हृतिकच्या (Hrithik Roshan) वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच ‘विक्रम वेधा’, ‘फायटर’ आणि ‘क्रिश ४’मध्ये दिसणार आहे. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...