Home गाजावाजा स्पेशल परदेशात भारतीय झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना काय होते शिक्षा?
गाजावाजा स्पेशल

परदेशात भारतीय झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना काय होते शिक्षा?

6
Indian Flag Insult
Indian Flag Insult

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, ब्रिटेनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय झेंड्याचा अपमान केला. भारतात जर एखादा तिरंग्याचा अपमान करतो तर त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाते. मात्र विदेशात जर एखाद्याने तिरंग्याचा अपमान केल्यास तर त्याला सुद्धा शिक्षा होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक सोशल मीडियात भारत सरकारला ब्रिटेनमधील भारतीय दूतवासावा टॅग करत प्रश्न विचारत आहेत की, अखेर तिरंग्याचा अपमान करणाऱ्या या खलिस्तानी समर्थकांवर कोणती कारवाई का केली जात नाहीय? विदेशात भारतीय झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना कायदेशीर शिक्षा होऊ शकत नाही का? आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत.(Indian Flag Insult)

संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे?
खरंतर १९ मार्च २०२३ रोजी लंडनध्ये भारतीय उच्चायोगाच्या बाहेर खलिस्तानी समर्थकांच्या गर्दीने आंदोलन केले होते. या दरम्यान खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायोगावर लावण्यात आलेला तिरंगा जबरदस्तीने खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता. तिरंग्याचा अपमान केल्याने भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भारताकडून दिल्लीतील ब्रिटीश मुत्सद्द्याला बोलावून भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत स्पष्टीकरण मागितले.

परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया देत असे म्हटले होते की ब्रिटेनमध्ये भारतीय राजनैतिक परिसर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत ब्रिटेन सरकार काहीच करत नव्हते, जे कोणत्याही प्रकारे स्विकार केले जाऊ शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून ब्रिटेनच्या सरकारने विएना कराराअंतर्गत मूलभूत जबाबदाऱ्यांचीही आठवण करून दिली. (Indian Flag Insult)

हे देखील वाचा- भारतातील सर्वाधिक महागडी डील, २५२ कोटींना विक्री झाला मुंबईतील ट्रिपलेक्स फ्लॅट

परदेशात जर तिरंग्याचा अपमान झाल्यास तर काय करु शकतो भारत
जर परदेशात तिरंग्याचा अपमान झाल्यास तर भारत सरकार सर्वात प्रथम ज्या देशात त्याचा अपमान झाला आहे त्याच्या दिल्लीत असलेल्या राजनैतिकाला बोलावून त्यावर आपले मतं व्यक्त करतो. त्याचसोबत भारत सरकार त्या देशाच्या राजनैतिकाकडे मागणी करु शकतो की, अशा प्रकारचे काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर काद्यानुसार शिक्षा करण्यात यावी. भारत सरकारने सुद्धा या प्रकरणी असेच पाऊल उचलले आहे. खरंतर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल अंतर्गत प्रत्येक देशाला आपल्या मित्र देशाच्या संबंधित प्रतीक चिन्हांचे आणि त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करावे लागते. हे कोणत्याही देशाची सर्वात प्रथम जबाबदारी असते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....