Home गाजावाजा स्पेशल गाडीवर तिरंगा लावण्याचे या काही व्यक्तींनाच अधिकार, अन्यथा होईल शिक्षा
गाजावाजा स्पेशल

गाडीवर तिरंगा लावण्याचे या काही व्यक्तींनाच अधिकार, अन्यथा होईल शिक्षा

9
independence day
independence day

Indian Flag Code : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. अशातच भारत सरकारने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अखेरच्या मन की बात कार्यक्रमात नागरिकांना तिरंग्यासोबत आपला सेल्फी ‘harghartiranga.com’ येथे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. पण राष्ट्रीय ध्वजाचा वापर आणि फडकवण्याचे काही कायदे-नियम आहेत. याचे उल्लंघन केल्यास शिक्षा होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण पाहतो की, काहीजण आपल्या बाइक अथवा कारवर तिरंगा लावतात. पण प्रत्येकाला तिरंगा गाडीवर लावण्यास परवानगी नाही. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

वाहनावर तिरंगा लावण्याचा कोणाला अधिकार?
नॅशनल फ्लॅग कोडनुसार, तिरंगा लावताना त्याची केशरी पट्टी वरच्या बाजूला असावी. याशिवाय फाटलेला अथवा मळलेला ध्वज कधीच फडकवू नये. अशातच गाडीवर कोण झेंडा लावू शकतो याबद्दल जाणून घेऊया.

भारतीय ध्वज संहिता, 2002 मधील परिच्छेद 3.44 नुसार, मोटार कारवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा अधिका केवळ पुढील व्यक्तींकडे आहे.
-राष्ट्रपती
-उपराष्ट्रपती
-राज्यपाल आणि उपराज्यपाल
-भारतीय मिशन पदांचे प्रमुख
-पंतप्रधान
-कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि संघाचे उपमंत्री
-एखादे राज्य अथवा केंद्र शासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री
-लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, लोकसभेचे उपाध्यक्ष, राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील विधान सभेचे अध्यक्ष, राज्यातील विधान परिषदेचे उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभेचे उपाध्यक्ष आणि केंद्र शासित प्रदेश भारताचे मुख्य न्यायाधीश.
-उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
-उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

नियम मोडल्यावर शिक्षा
नागरिकांना घरावर तिरंगा फडकवण्यास किंवा हातात झेंडा घेऊन चालण्याचे स्वातंत्र्य आहे. पण खासगी वाहनांवर झेंडा लावणे कायदेशीर गुन्हा आहे. या प्रकरणात एखादा दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाते. एवढेच नव्हे तीन वर्षांचा तुरुंगवास, दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (Indian Flag Code)

झेंडा फडकवताना या गोष्टी लक्षात ठेवा
नियमांनुसार, कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक, खासगी, संस्था अथवा सदस्य कोणत्याही दिवशी आणि कधीही राष्ट्रीय ध्वज फडकवला जाऊ शकतो. पण राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा पूर्ण सन्मान करणे महत्वाचे आहे. त्याची जागा योग्य असावी. ध्वज अस्वच्छ ठिकाणी अथवा जमीनीवर ठेवू नये. एवढेच नव्हे फाटलेला, मळलेला ध्वज कधीच फडकवू नये.


आणखी वाचा :
गुजरातमधील ऐतिहासिक शहर चंपानेर, जाणून घ्या खासियत
श्रावणी शनिवारची माहिती आणि पूजा विधी

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....