Home राष्ट्रीय तिस-या महायुद्धाची तारीख सांगणारे भारतीय ज्योतिषी
राष्ट्रीय

तिस-या महायुद्धाची तारीख सांगणारे भारतीय ज्योतिषी

21
World War III

रशिया आणि युक्रेन या देशांमधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. इकडे इस्त्रायाल आणि हमास यांच्यामध्येही युद्ध सुरु आहे. त्यातच इराणच्या राष्ट्रपतींच्या मृत्यूनंतर इराणनं इस्त्रायलवर यासंबंधात शंका व्यक्त केली आहे.(World War III)

अमेरिकेलाही चीन आणि रशियानं धमकी दिली आहे. तिकडे तो उत्तर कोरियाचा किम जोंग उन हा रोज कुठल्या कुठल्या क्षेपणास्त्राची चाचणी करत आहे. एकूण काय जगभर अशांततेचे वातावरण आहे. यात भर म्हणून की काय, दोनच दिवसापूर्वी चीनने तैवान या देशाला लष्करी सरावाच्या नावानं घेराव घातला आहे,  तज्ञांच्या मते चीन तैवानला ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरु करणार आहे.  म्हणजेच जगावर तिस-या महायुद्धाचे ढग जमले आहेत. 

या सर्व परिस्थितीत भारतातील एका ज्योतिषाची भविष्यवाणी सोशल मिडियावर सर्वात व्हायरल होत आहे.  नवीन नॉस्ट्रॅडॅमसम्हणून या भारतीय ज्योतिषींना ओळखले जाते. तिस-या महायुद्धाची अचूक तारीख सांगण्याचा दावा करणारे हे भारतीय ज्योतिषी आहेत कुशल कुमार. त्यांनी जी तिस-या महायुद्धाची तारीख सांगितली आहे, ती आहे, १८ जून २०२४.  अर्थातच कुशल कुमार यांच्या मते, पुढच्याच महिन्यात तिसरे महायुद्ध सुरु होणार आहे.  (World War III)

२८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ या दरम्यान पहिले महायुद्ध झाले. इतिहासातील सर्वात मोठे महायुद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या या युद्धात सात कोटी सैनिकांनी भाग घेतला. युद्धामुळे किती अर्थहानी झाली याची हिशोब नाही. पहिल्या महायुद्धाच्या आठवणी पुसल्या जातात ना जातात तोच, १९३९ ते १९४५ दरम्यान दुसरे महायुद्ध झाले. 

हे युद्ध प्रामुख्याने युरोप आणि आशियामध्ये मित्र राष्ट्रे यांच्यात झाले. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्याचे निमित्त झाले आणि जग दुस-या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले. आता या दोन्ही महायुद्धांच्या आठवणी पुसट होतील, असे तिसरे महायुद्ध होणार असल्याची भविष्यवाणी भारतीय ज्योतीषांनी केली आहे. या तिस-या महायुद्धात (World War III) सगळीकडे क्षेपणास्त्रे आणि तोफगोळ्यांचा आवाज दुमदुमेल असेही त्यांनी सांगितले आहे.  

याआधीही नॉस्ट्राडेमस आणि बाबा वेंगा यांच्यासह अनेक ज्योतिषींनी तिस-या महायुद्धाच्या भविष्यवाणी केल्या आहेत. मात्र या सर्वात आता भारतीय ज्योतिषी कुशल कुमार यांनी व्यक्त केलेली तारीख सोशल मिडियावर सर्वात जास्त व्हायरल होत आहे. 

कुशल कुमार यांनी स्वतःचा आपल्या सोशल अकांऊटद्वारे ही तिस-या महायुद्धाची तारीख जाहीर केली.  त्यांनी दावा केला आहे की, तिसरे महायुद्ध आता काही आठवडे दूर आहे.  १८ जून २०२४ रोजी तिसरे महायुद्ध सुरु होणार आहे.  ही तारीख अचूक असल्याचा दाखला देतांना त्यांनी अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

त्यांच्या मते २०२४ हे वर्ष युद्धप्रवण वर्ष आहे. इस्त्रायल-हमास, कोरिया, चीन तैवान या देशांमध्येही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ती तिस-या महायुद्धाची नांदी असल्याचे कुशल कुमार यांनी म्हटले आहे. तसेच काही देशांवर राज्य करणाऱ्या देशांसाठी मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच काही मोठ्या नेत्यांची  तब्येत गंभीर होऊन, ते त्या मोठ्या राजकीय पदाचा राजीनामा देऊ शकतात. (World War III)

============

हे देखील वाचा : नेपाळच्या नोटेवर भारताचे चित्र गेलेच कसे

============

थोडक्यात सर्वत्र अस्थिरतेची स्थिती निर्माण होणार आहे. अशातच तिस-या महायुद्धासाठी उपयुक्त असे वातावरण तयार होणार आहे. मंगळवार, १८ जून २०२४  रोजी तिसरे महायुद्ध सुरु होईल.  महायुद्ध सुरु होण्यासाठी जी ग्रहांची स्थिती आवश्यक असते, त्या स्थितीत महायुद्धचा भडका उडणार आहे.  कुशल कुमार यांच्या मते १० जून पासूनच अशा घटना घडण्यासास सुरुवात होतील. २९ जून पर्यंत ही अशीच युद्धजन्य स्थिती रहाणार आहे. (World War III)

कुशल कुमार यांना नवीन नॉस्ट्राडेमसअसेही म्हटले जाते. महान फ्रेंच ज्योतीषकर्ता नॉस्ट्राडेमस यांच्या लेस प्रोफेसीजया पुस्तकात देशविदेशातील अनेक घटनांचा आधीच उल्लेख करुन ठेवण्यात आला आहे. या भविष्यवाणींचा अभ्यास केल्यावर त्या ख-या झाल्याचे लक्षात आले आहे. आता भारतातील कुशल कुमार या ज्योतिषींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. १८ जून ही तारीख किती खरी आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचा संदर्भ दिला आहे.  

सई बने

Recent Posts

Related Articles

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...

Anil Ambani
राष्ट्रीयराष्ट्रीय

Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ED चा छापा

भारतातील नावाजलेले उद्योजक असलेल्या अनिल अंबानींवरील संकटाचे ढग काही केल्या कमी होताना...