Home आंतरराष्ट्रीय War : पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद
आंतरराष्ट्रीयराजकारण

War : पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद

11
War

पहलगामवरील भ्याड हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे मिशन पार पाडले. या ऑपरेशन सिंदूर मिशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांची ठिकाणं जमीनदोस्त केली. भारताच्या या सणसणीत प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान चवताळला आणि त्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमारेषेवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आणि सोबतच जवान दिनेश कुमार शर्मा हे देखील शहीद झाले आहेत. (War)

पाकिस्तानने सीमारेषेवरील पुंछ या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार करत अनेक उखळी तोफांनी हल्ला केला. याला भारतीय सैन्याने देखील सडेतोड उत्तर देत गोळीबार केला. मात्र दुर्दैवाने यामध्ये भारतीय सैन्यातील सैनिक दिनेश कुमार शर्मा हे शहीद झाले आहे. हरियाणाच्या पालवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावचे ३२ वर्षीय लान्स नायक दिनेश कुमार शर्मा यांना वीरमरण प्राप्त झाले. (Marathi Latest News)

दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर करत दिनेश कुमार शर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तानने पुंछ भागात गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने देखील उत्तर दिले. याच हल्ल्याला उत्तर देताना लान्स नायक दिनेश कुमार शर्मा यांना वीरमरण आले आहे. त्यांचा त्याग भारत कधीही विसरणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांचा गर्व आहे. दिनेश शर्मा यांच्या कार्याला माझा सलाम.” (Marathi News)

War

दरम्यान बुधवारी लान्स नायक दिनेश कुमार शर्मा यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला. मात्र मधेच त्यांच्या फोनचा संपर्क तुटला. शर्मा यांच्या पत्नीला काहीच ऐकू येत नव्हते. त्यानंतर थोड्या वेळाने दिनेश शर्मा यांच्या सहकाऱ्याने दिनेश यांच्या पत्नीला फोन केला आणि ते जखमी झाल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर काही वेळाने पुन्हा की फोन आला आणि तेव्हा दिनेश यांच्या पत्नीला ते शहीद झाल्याची बातमी देण्यात आली. या बातमीनंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. (Marathi Trending News)

सीमा यांनी सांगितले की, “मी काल रात्री त्यांच्याशी बोलले होते. त्यांनी मला रात्री १२ वाजता फोन करण्याचे सांगितले होते. मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण त्यांचा फोन आलाच नाही. मी त्यांची आतुरतेने वाट पाहत राहिली,” हे सांगताना सीमा यांना अश्रू अनावर झाले.

=======

हे देखील वाचा : Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

=======

याशिवाय दिनेश कुमार शर्मा यांचे वडील दया चंद यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, “माझा मुलगा शहीद झाला आहे. त्याचा लहान भाऊसुद्धा सैन्यातच सेवा बजावत आहे. जर ते दोघेही देशासाठी शहीद झाले, तर मी स्वतः भारत देशासाठी बलिदान देईन. मी लोकांना देखील आवाहन करेन की त्यांनी आपल्या मुलांना सैन्यात पाठवावे. मला याचा खूप अभिमान आहे.” यासोबतच त्यांनी सांगितले, ” दिनेश २०१४ साली सैन्यात भरती झाला होता. अलीकडेच त्याची लान्स नायक म्हणून बढती झाली होती. सध्या तो जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात तैनात होता.” (Marathi Top News)

दरम्यान शहीद दिनेश कुमार शर्मा यांच्या पश्चात त्यांची पत्नी सीमा आणि पाच वर्षाचा मुलगा दर्शन आणि सात वर्षाची मुलगी काव्या आहेत. सीमा या वकील आहेत.

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...