Home गाजावाजा स्पेशल Income Tax Refundच्या नावाखाली नागरिकांची लूट, हा मेसेज आल्यानंतर क्लिक करू नका
गाजावाजा स्पेशल

Income Tax Refundच्या नावाखाली नागरिकांची लूट, हा मेसेज आल्यानंतर क्लिक करू नका

10
Income Tax Notice
Income Tax Notice

Income Tax Return Fraud:  जर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली एखादा मेसेज आलाय का? त्यावर क्लिक करण्याआधी सावध राहा. अशा प्रकारचा मेसेज तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. गृह मंत्रालयाकडून युजर्सला इशारा देण्यात आला आहे की, त्यांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये ज्यामध्ये तुम्हाला टॅक्सचे पैसे रिफंड मिळतील असा दावा केलाय. असे मेसेज बनावट असून तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.

आजकाल इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली सायबर हल्लेखोर तुमच्या बँक खात्यातील रक्कम सहज लंपास करू शकता. सायबर हल्लेखोर टॅक्स डिपार्टेंच्या नावाखाली लोकांना मेसेच पाठवून त्यांना रिफंड मिळण्यासाठी सज्ज व्हा असा दावा करतात. याशिवाय मेसेजमध्ये एक लिंक पाठवून त्याच्या माध्यमातून रिफंड मिळवण्यास सांगतात. पण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कोणत्याही मेसेज किंवा वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

फसवणूकीपासून असे राहा दूर
-इनकम टॅक्सकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा ईमेल मागितला जात नाही
-तुम्हाला एखादा असा मेसेज आला असेल त्यामध्ये तुमची खासगी माहिती मागितली असेल तर त्यावर क्लिक करू नका
-इनकम टॅक्स रिफंडसाठी केवळ अधिकृत इनकम टॅक्सच्या वेबसाइटला भेट द्या (Income Tax Return Fraud)

या गोष्टीही लक्षात ठेवा
-इनकम टॅक्स रिफंडच्या नावाखाली आलेल्या मेसेजव विश्वास ठेवू नका
-आपल्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका
-आपल्या कंप्युटर किंवा फोनवर नेहमीच अँण्टीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करून ठेवा.


आणखी वाचा :

अशा पद्धतीने सुधारा तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर

पोलीस वेरिफिकेशननंतरही पासपोर्ट न आल्यास करा हे काम

WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी नवे फीचर लाँच, जाणून घ्या अधिक

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....