Home प्रेस रिलीझ किचन कल्लाकारच्या किचनमध्ये तू तेव्हा तशी मालिकेच्या कलाकारांचा कल्ला
प्रेस रिलीझमनोरंजन

किचन कल्लाकारच्या किचनमध्ये तू तेव्हा तशी मालिकेच्या कलाकारांचा कल्ला

11
किचन

झी मराठीवरील किचन कल्लाकार या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.

नुकतंच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेत कलाकार आता किचन कल्लाकरच्या सेटवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे त्याचसोबत दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे किचन कल्लाकर या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना दिसतील.

====

हे देखील वाचा: मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका

====

या भागात महाराजांसाठी चविष्ट पदार्थ करताना या कलाकारांची तारांबळ तर उडालीच पण त्याचसोबत या कलाकारांनी सगळ्यांसोबत काही मजेदार किस्से देखील शेअर केले.

अभिज्ञा भावे हिने एकदा मालिकेच्या सेटवर पावभाजी नेली. आईने डब्बा भरून बास्केट मध्ये ठेवला त्यामुळे अभिज्ञाला त्याची कल्पना नव्हती आणि तिने सेटवर जाऊन तिने सगळ्यांसाठी पावभाजी आणली असल्याचं सांगितलं पण जेव्हा बास्केट उघडलं तेव्हा नक्की काय झालं? हे प्रेक्षकांना आगामी भागात कळेल.

तसंच स्वप्नील जोशीने एक खूपच चांगली गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली. जेव्हा बाकी कलाकारांना स्वप्नील खूप खर्च करतो का असा प्रश्न विचारला तेव्हा हि गोष्ट खोटी असून स्वप्नील त्याच्या आई बाबांनी त्याला पैसे खर्च करण्याबाबत काय शिकवण दिली आहे हे सगळ्यांना सांगितलं.

====

हे देखील वाचा: सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव

====

इतकंच नव्हे तर स्वप्नील आजही त्याची सर्व कमाई आई वडिलांच्या हाती सुपूर्द करतो आणि त्याला महिन्याला त्याचे आईवडील खर्चाला काही ठराविक पैसे देतात हे हि स्वप्नीलने सांगितलं. त्यामुळे हा धमाल मजा मस्तीने भरलेला भाग पाहायला विसरू नका बुधवारी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...