Home गाजावाजा स्पेशल शेजाऱ्यांसोबत मैत्री करायची असेल तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
गाजावाजा स्पेशल

शेजाऱ्यांसोबत मैत्री करायची असेल तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

7
Friendship with neighbors
Friendship with neighbors

Friendship with neighbors- आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचे महत्व आपल्याला माहिती असते. त्यामुळेच ती नाती अधिक काळ टिकून कशी राहतील यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो. याच कारणास्तव विविध कार्यक्रम-सणउत्सांवेळी आपण त्यांच्याकडे भेटण्यासाठी जातो किंवा त्यांना आपल्या घरी बोलावतो. परंतु तुमचे शेजाऱी राहणाऱ्या लोकांसोबत संबंध कसे आहेत हे सुद्धा फार महत्वाचे असते. कारण अडीअडचणीवेळी प्रथम शेजारचीच माणसं तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकासोबत नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा.

मात्र काही लोकांची अशी समस्या असते की, शेजाऱ्यांसोबत त्यांचे वाकडे असते. त्यामुळे शेजारच्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही घेणदेण नाही असे म्हणत आपण राहत असतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहात की, आपले शेजारी हे आपले चांगले मित्रच नव्हे तर घरातील एका मंडळींसारखे नाते जोडू शकतात. अशातच जर तुम्हाला सुद्धा शेजारच्या व्यक्तींसोबत उत्तम संबंध जोडायचे असतील तर काही गोष्टी जरुर लक्षात घ्याव्या लागतील. तर जाणून घेऊयात शेजाऱ्यांसोबत मैत्री कशी कराल?

-शेजाऱ्यांशी हसत-खेळत वागा
जेव्हा आपण कधी आपल्या मित्राला भेटतो तेव्हा त्याला आपण प्रमथ हाय-हॅलो असेच बोलतो. त्यानंतर आपले पुढील संभाषण त्याच्यासोबत सुरु होतो. त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा शेजाऱ्यांशी मैत्री वाढवायची असेल तर हसत हसत त्यांना हाय-हॅलो कधीतरी करत जा. येथूनच तुमच्या नात्याला सुरुवात होईल.

-शेजाऱ्यांना आपल्या घरी केलेली एखादी स्पेशल डिश द्या
जर तुम्हाला शेजाऱ्यांसोबत अधिकच नातेसंबंध जोडायचे असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही घरी तयार केलेली एखादी स्पेशल डिश शेअऱ करा. तुम्ही ज्या काही गोष्टी उत्तम बनवता त्या बद्दल त्यांना सुद्धा सांगा. असे केल्याने शेजाऱ्यांसोबत आपुलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते.

हे देखील वाचा- ‘या’ देशात लावलं गेलंय पैशांचं झाड, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Friendship with neighbors
Friendship with neighbors

-शेजाऱ्यांना त्यांच्याबद्दल विचारत रहा
काही वेळेस खासगी कामांमध्ये वस्त असलेले शेजारी खुप दिवस आपल्याला घरात दिसत नाहीत. परंतु अशावेळी जर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन इतर मंडळींशी त्यांच्याबद्दल विचारु शकता. त्यांच्याबद्दल विचारत जा.

-शेजाऱ्यांना नक्की मदत करा
शेजारी असले म्हणून काय झाले ते आपल्या परिवाराप्रमाणे असतात. कारण ज्यावेळी आपल्याला खरंच गरज असते तेव्हा तिच लोक आपल्यासाठी उभी राहतात. जसे की, तुमच्या घरी एखादे पार्सल येणार असेल आणि तुम्ही घरी नसाल तर तुम्ही त्यांना कोणताही विचार न करता ते घेण्यास सांगू शकता.

-शेजाऱ्यांना त्रास होणार नाही असे वागा
शेजाऱ्यांसोबत मैत्री केली तरीही आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही ना याची सुद्धा काळजी घ्या. जसे की, आपण आपल्या घरात खुप जोरात आवाज करुन टीव्ही पाहतोय पण शेजाऱ्यांच्या घरात असलेला मुलगा अभ्यास करतोय हे थोडे तुमच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्यासारखे आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....