Home मनोरंजन मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये वऱ्हाडी बनून सामील झाला कपिल शर्मा, मात्र त्याला आहे ‘या’ गोष्टीची भीती  
मनोरंजन

मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये वऱ्हाडी बनून सामील झाला कपिल शर्मा, मात्र त्याला आहे ‘या’ गोष्टीची भीती  

11
kapil sharma
kapil sharma

बॉलिवूडमध्ये सध्या वेडिंग सिझन चालू आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत असून, काही लवकरच लग्न देखील करणार आहे. या सर्व कलाकारांच्या यादीमध्ये आता मनोरंजनाविश्वातील आघाडीचा आणि अतिशय लोकप्रिय गायक मिका सिंगचे देखील नाव लवकरच सामील होणार आहे. आपल्या सर्वानाच माहित आहे की, मिका लग्न नव्हे तर स्वयंवर रचत त्याच्या भावी वधूचा शोध घेणार आहे. मिकाचे हे स्वयंवर राजस्थानमधील जोधपूर येथे संपन्न होणार आहे. या स्वयंवरासाठी आता वऱ्हाडी देखील हळूहळू जमायला लागले आहेत. या वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक नाव सामील असून त्यातलेच एक नाव म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा(kapil sharma). आपल्या जवळच्या मित्राच्या लग्नासाठी जोधपूरला रवाना झाला आहे. खुद्द त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

सध्या जोधपूरमध्ये मिकाचे स्वयंवर चालू आहे. मोठ्या भव्य दिव्य शानदार सोहळ्यामध्ये जोधपूरलमधील किलेनुमा हॉटेलमध्ये मिकाचे स्वयंवर चालू आहे. कपिल शर्मा (kapil sharma) आणि मिका सिंग हे किती जवळचे, घनिष्ठ मित्र आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मिकाचे स्वयंवर आणि कपिल जाणार नाही असे होणारच नाही. कपिल शर्मा नुकताच एका खासगी विमानाने मुंबईहून जोधपूरसाठी निघाला. याचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कपिलसोबत इतरही अनेक लोकंसुद्धा दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कपिल कमालीचा स्टायलिश आणि कुल दिसत आहे. 

कपिलने त्याचे या प्रवासाचे फोटो शेअर करत सांगितले की, तो मीकाच्या लग्नासाठी जात आहे. यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले, “भाऊ मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये सहभागी होण्यासाठी जोधपूरला जात आहे. खूपच खर्च झाला, भीती याच गोष्टीची आहे की, नवरदेव वेळेवर नकार नको द्यायला.” या सोबतच त्याने हे देखील सांगितले की त्याने घातलेले कपडे त्याच्या बायकोने गिन्नीने त्याच्यासाठी निवडले आहेत. या फोटोमध्ये कपिलने (kapil sharma) पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट गॉगल घातला आहे. हे सर्वच त्याच्यावर खूपच चांगले दिसत आहे. त्याच्या फॅन्सला कपिलचा लूक आणि त्याने दिलेले कॅप्शन खूपच आवडत आहे.  

तत्पूर्वी ‘मीका दी वोटी’ नावाचा एक रियालिटी शोअसून या शोमध्ये आलेल्या सुयोग्य मुलींमधून मिका त्याच्यासाठी योग्य मुलगी शोधणार आहे. हा शो लवकरच टीव्हीवर देखील प्रसारित केला जाणार असून, त्यासाठी कपिल जोधपूरला गेला आहे. कपिल सध्या त्याच्या ‘द कपिल शर्मा(kapil sharma) शो’मध्ये चांगलाच व्यस्त असून नेटफ्लिक्सवर आलेला त्याचा स्टॅन्ड अप कॉमेडी शोदेखील चांगलाच गाजत आहे. तर मिका बॉलिवूडमधील मोठ्या आणि प्रसिद्ध गायकांपैकी आहे. मिकाने गायलेले जवळपास सर्वच गाणी तुफान हिट झाली आहेत. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...