Home आरोग्य काखेतील काळेपणा ‘या’ घरगुती उपायांनी करा दूर
आरोग्य

काखेतील काळेपणा ‘या’ घरगुती उपायांनी करा दूर

12
Dark Underarms

प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष आपल्या शरीराची आणि आपल्या दिसण्याची योग्य ती कमी जास्त प्रमाणात काळजी घेत असतात. अनेकांसाठी चेहऱ्याचे सौंदर्यच सर्वस्व असते, तर अनेकांसाठी संपूर्ण शरीरच उत्तम आणि आकर्षक दिसणे महत्वाचे असते. यासाठी पार्लरमध्ये जाण्यासोबतच अनेकदा आपण विविध घरगुती उपाय वापरत असतो. मात्र या आपल्या सौंदर्याच्या अनेक समस्यांपैकी एक सर्वात मोठी आणि महत्वाची समस्या म्हणजे काळे अंडरआर्म्स.

त्वरित केस काढण्यासाठी बरेच लोकं0 रेजरचा वापर करतात. हे वारंवार केल्यामुळे स्किनवर काळपटपणा येऊ शकतो. यशिवाय आपल्या शरीरातील हार्मोनल बदल, डेड स्किन सेल्स, एक्जिमा, पोषणाची कमतरता आदी अनेक कारणं अंडरआर्म्सच्या काळपटपणास कारणीभूत ठरू शकतात.

अर्थात काखेमध्ये येणार काळपटपणा. हा त्रास आणि याचा जास्त परिणाम मुलींवर बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. या त्रासामुळे अनेकदा मुली स्लिव्हलेस ड्रेस वापरणे देखील कमी करतात किंवा बंद करतात. हा काळेपणा दूर करण्यासाठी अनेक महागडी ट्रीटमेंट आपण करतो मात्र तरीही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला आज काही फायदेशीर आणि सोपे उपाय सांगणार आहोत.

Dark Underarms

लिंबाचा रस
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी ३ चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात साखर मिक्स करून ते काखेत लावा. हे मिश्रण काखेत लावून १० मिनिटं मसाज करा. काखेतील काळपटपणा नक्की दूर होईल.

ॲपल सायडर व्हिनेगर
अन्नात आंबटपणा वाढवणाऱ्या ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अमीनो आणि लैक्टिक ॲसिड असते. यात तुरट गुणधर्म आहेत, जे तुमच्या त्वचेतील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. ॲपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब अंडरआर्म्सवर लावा आणि वाळल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून टाका.

एलोवेरा जेल
एलोवेरा म्हणजेच कोरफड आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. एलोवेरा जेल एक महिना सतत काळ्या अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणा दूर होण्यास मदत होते.

बटाट्याचा रस
बटाट्याचा रस हा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. या रसाने काखेत मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास अंडरआर्म्समध्ये फरक जाणवतो.

तांदळाचे पीठ आणि मध
तांदळाच्या पिठात मध मिक्स करून स्क्रब करा जेणेकरून डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा पुन्हा गोरी होण्यास मदत होईल. तांदळाचे पीठ आणि मध यांचे मिश्रण लावून स्क्रब केल्यानंतर थोड्यावेळाने हात स्वच्छ धुवा. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ओट्सचे पीठ देखील वापरू शकतात.

बेकिंग सोडा आणि दही
अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा खूप चांगला मानला जातो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा, आणि ती अंडरआर्म्सवर लावून स्क्रब करा. थोड्या वेळाने हात स्वच्छ धुवा.

हळद-बेसन-दही पॅक
या पॅकेचा काखेतीली काळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. हा पॅक साधारण 10 मिनिटं काखेत लावून ठेवा नंतर पाण्याने धुवा.

इनो
इनोमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. आणि हे मिश्रण सुमारे 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म्सवर लावून ठेवा.

कोरफड
कोरफडीचा गर काढून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी अंडर आर्मवर लावून ठेवा.

बदाम तेल
बदाम तेलाचा मसाज काखेत केल्याने त्वचा उजळण्यास फायदा होतो.

काकडी
काकडीची पेस्ट बनवा आणि या पेस्टने काखेत मसाज करा.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...