कधी अचानक आपल्याला आपल्या शरीराच्या काही भागावर गोल, लाल काळपट रंगाची पुळी सारखी कडक त्वचा जाणवायला लागते. काहींना याचा त्रास होत नाही तर काहींना त्यातून रक्त येणे, पु येणे किंवा दुखणे अशा समस्या होतात. यालाच चामखीळ असे म्हटले जाते. चामखीळ म्हणजे त्वचेवरील एक लहान, निरुपद्रवी वाढ, जी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) नावाच्या विषाणूमुळे होते. चामखीळ ही खासकरून हातांवर, पायांवर, मानेवर किंवा शरीराच्या इतर भागांवर येऊ शकते. चामखीळ कोणत्याही वयात येऊ शकते याला वयाचे किंवा काळाचे बंधन नसते. (Warts)
तसे पाहिले तर चामखिळीचा असा खास त्रास कोणताही नसतो, मात्र ती शरीराच्या सौंदर्यावर परिणाम करत असते. चामखीळ दिसायला जरी किरकोळ वाटत असली, तरी ती मानेवर, चेहऱ्यावर किंवा हातावर असेल, तर ती तुमचा संपूर्ण लूकच बिघडवते. काहींसाठी चामखीळ ही लाजीरवाणी बाब असते. त्यामुळे ते ती लपवण्यासाठी सतत विविध उपाय करताना दिसतात. चामखीळ म्हणजे काही आजार नाही, पण ती एकदा झाली की काळजी घेतली नाही तर दुसऱ्या भागांवरही पसरण्याची शक्यता असते. (Marathi News)
चामखीळ काढण्यासाठी अनेक लोकं बराच प्रयत्न करतात. मात्र ती काही केल्या जात नाही. बाजारात चामखीळ काढण्यासाठी काही क्रीम्स किंवा सर्जिकल उपाय सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र ते सर्व तसे पाहिले तर खर्चिक आणि त्रासदायक आहे. मात्र आज आम्ही यावरच काही घरगुती सोपे आणि त्रास न होणारे उपाय घेऊन आलो आहोत. चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपचार जाणून घेऊया. (Top Stories)

बेकिंग सोडा
चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब टाकावे आणि हे मिश्रण चामखीळवर लावून हलक्या हातांनी मालिश करा. एक तास ते तसेच राहू द्यावे. त्यांनतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय एक महिना नियमितपणे केल्यास नक्कीच फरक जाणवेल. (Todays Marathi Headline)
कांद्याचा रस
कांद्यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचावरील संसर्ग कमी करण्यास मदत करतात. चामखिळीवर कांद्याचा रस थेट लावल्यास ती हळूहळू सुकून गळून पडते. एक चमचा कांद्याचा रस घेऊन तो कापसाच्या बोळ्याने चामखीळ असलेल्या भागावर लावावा आणि शक्य असेल तर रात्री झोपताना लावून ठेवावे आणि सकाळी सौम्य साबणाने तो भाग धुवावा. आठवड्यातून २–३ वेळा हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसतील. (Marathi Latest News)
अॅपल व्हिनेगर
अॅपल व्हिनेगरमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुण त्वचेचे pH संतुलन सुधारतात आणि चामखिळी विरघळण्यास मदत करतात. एक छोटा कापसाचा बोळा अॅपल व्हिनेगरमध्ये भिजवावा आणि चामखीळ असलेल्या भागावर हलक्याने दाबून ठेवावा. नंतर त्या भागावर पट्टी लावावी. ३०–४५ मिनिटांनी ती काढून टाकावी. दिवसातून एकदा हा उपाय केल्यास काही दिवसांत चामखीळ कोरडी होऊन गळून पडू शकते. (Top Stories)
लसूण
लसूण हा औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लसूणामध्ये असलेल्या सल्फरयुक्त घटकांमुळे त्वचावरील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन कमी होते. लसणाच्या पाकळ्या अर्धवट चिरून त्या चामखीळवर हलक्या हाताने चोळा किंवा लसणाची पेस्ट तयार करून ती थेट चामखिळीवर लावा. १५–२० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने किंवा सौम्य साबणाने धुवा. काही दिवस हा उपाय केल्यास फरक दिसेल. (Marathi Top News)
==============
हे देखील वाचा : Chenab Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आर्च ब्रिजचे उदघाटन; ‘ही’ आहेत या ब्रिजची वैशिष्ट्ये
==============
केळ्याची साल
सगळे जणं केळं खाल्ल्यावर त्याची साल सरळ कचऱ्याच्या पेटीत फेकतात. पण हीच साल त्वचेसाठी उपयोगी ठरू शकते हे फार कमी जणांना माहीत असतं. केळ्याच्या सालीमध्ये असलेल्या नैसर्गिक एंझाइम्समुळे चामखिळी हळूहळू मऊ होते आणि ती नैसर्गिकरित्या नष्ट होते. रात्री झोपताना सालीची आतील बाजू चामखीळीवर ठेवा आणि त्यावर हलकं कापड बांधा. हा उपाय सलग काही आठवडे केल्यास चामखीळ गळून पडते. (Social Updates)
कॅस्टर ऑइल
कॅस्टर ऑइल अर्थात एरंडेल तेल हे त्वचेला पोषण देण्यासाठी उपयुक्त असे तेल आहे. यामध्ये असलेले रिच फॅटी अॅसिड्स त्वचेची पुनर्बांधणी करतात आणि चामखीळीची वाढ थांबवतात. एक चमचा कॅस्टर ऑइलमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण चामखिळीवर लावा. हलका मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवून नंतर धुवा.
- aesthetic cream
- blood spots
- dermafiller
- health care
- home remdies for warts
- milia
- milia removal
- skin care
- Skin Care Tips
- skin tag
- skin tag removal
- skin tag remover
- skin tag treatment
- skin tags
- skin tags removal
- spots
- thre adveins treatment
- thread veins
- threadveins removal
- verruca
- verruca removal
- verruca treatment
- verrucae
- verrucas
- verrucavulgaris
- verucca
- wart
- wart removal
- Warts
- warts andall
- warts issue
- warts removal
- warts remover
- warts treatment
- आरोग्य टिप्स
- चामखीळ
- चामखीळ आणि आरोग्य
- चामखीळ कशी काढावी?
- चामखीळ काढण्यासाठी उपाय
- चामखीळ म्हणजे काय?