Home गाजावाजा स्पेशल वारंवार लघवी होत असल्याने त्रस्त आहात? ‘या’ घरगुती उपायांनी समस्येला करा दूर
गाजावाजा स्पेशल

वारंवार लघवी होत असल्याने त्रस्त आहात? ‘या’ घरगुती उपायांनी समस्येला करा दूर

10
Health Tips
Health Tips

काही लोकांना वारंवार लघवी होत असल्याची समस्या असते. त्यामुळे ही समस्या सर्वसाधारण असल्याचे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र तज्ञांच्या मते जर व्यक्ती एका दिवसात 8 पेक्षा अधिक वेळा लघवी करत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. कारण तुम्हाला एखादी समस्या किंवा त्रास सुरु झाला असेल आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. वारंवार लघवी होण्यामागे काही कारणे सुद्धा असू शकतात. त्यापैकी युरिन इंन्फेक्शन, मूतखडा अशा समस्यांचे रुग्ण बहुतांश वेळा आढळून येतात. ऐवढेच नव्हे तर मधुमेह असलेल्या व्यक्तींना सुद्धा वारंवार लघवी होते.(Health Tips)

या व्यतिरिक्त जी लोक खुप दारु पितात, तणावाखाली असतात त्यांना सुद्धा वारंवार लघवी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशातच वेळीच डॉक्टरांना गाठा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या. मात्र काही घरगुती उपाय सुद्धा आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही ते काही प्रमाणात कमी करु शकता.

हे देखील वाचा- मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका हवी असेल, तर नियमित करा हे योगप्रकार!

Health Tips
Health Tips

-मेथी दाणे
आयुर्वेदात मेथीचे दाणे एक औषधाच्या रुपात वापर करण्याचा सल्ला दिला जातो. याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होऊ शतात. जसे मधुमेह नियंत्रणात ठेवणे, उच्च रक्तदाब किंवा वारंवार लघवीची समस्या कमी करु शकते. अशातच तुम्ही दररोज मेथी दाण्याचे पाणी प्यायले पाहिजे. त्यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी तेच पाणी उकळवून प्या.

-दही
दह्यात अँन्टीबायोटिक्स असतात जे शरिरात असलेल्या बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करतात. दहीच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारतेच पण किडनी सुद्धा हेल्दी राहण्यास मदत करते. तुमची किडनी साफ असेल तर तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होऊ शकते. रोज सकाळी योग्य प्रमाणात दही खा.

-दालचिनी
दालचिनी ही आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानली जाते. याच्या सेवनाने वारंवार होणाऱ्या लघवीच्या समस्येला दूर ठेवता येईल. या व्यतिरिक्त मधुमेह सुद्धा नियंत्रणात राहील. आयुर्वेदात उत्तम आरोग्यासाठी दालचिनीच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून प्या.(Health Tips)

-आवळा
आवळ्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. आवळ्यात विटामीन सी असते जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवते. त्यामुळे तुम्हाला जरी वारंवार लघवीची समस्या असेल तर आवळ्याचे सेवन करा.

घरगुती उपायांनी तुम्ही लघवीच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण आणू शकता. मात्र याचा अधिकच त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही सल्ल्याशिवाय लघवी होण्याच्या समस्येवर औषध घेणे टाळा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....