Home आरोग्य बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? होऊ शकतात हे गंभीर आजार
आरोग्य

बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? होऊ शकतात हे गंभीर आजार

6
Health Care Tips
Health Care Tips

Health Care Tips : बद्धकोष्ठता अशी एक समस्या आहे ज्यामुळे शौचास समस्या होऊ शकते. व्यक्तीला आठवड्यातून कमी वेळेस शौचास झाल्यास अथवा त्रास होत असल्यास अशा स्थितीत बद्धकोष्ठतेची स्थिती निर्माण होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्या सध्या सर्वसामान्य असली तरीही यामुळे काही आजार मागे लागू शकतात.

बद्धकोष्ठतेमुळे पोट जड वाटणे, भूक न लागणे अथवा शौच करताना रक्त पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणात बद्धकोष्ठतेमुळे उलटी देखील होऊ शकते. याशिवाय वजन वाढूही शकते.

बद्धकोष्ठतेमुळे वजन वाढते
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बद्धकोष्ठतेमुळे व्यक्तीचे वजन वाढले जाऊ शकते. यामुळे शरिरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया मंदावली जाते. अशातच शरिरात फॅट्स जमा होऊ लागतात. सातत्याने फॅट्स जमा झाल्याने वजन वाढू शकते. बद्धकोष्ठता झालेल्या व्यक्तीला कमी भूक लागणे अथवा अचानक खूप भूक लागणे अशा समस्येचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळेही बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

बद्धकोष्ठतेची समस्या का उद्भवते?
-डाएटमध्ये फायबरची कमतरता
-व्यायाम न केल्याने वजन वाढणे
-पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
-पुरेशी झोप न घेणे (Health Care Tips)

पुढील आजार उद्भवण्याची शक्यता
-यकृतासंबंधित समस्या
-आतड्यांचा कॅन्सर
-पोटात इंफेक्शन
-आयबीएस

असा करा बचाव
-द्रव पदार्थांचे अत्याधिक सेवन करा
-रसाळ फळांचे सेवन करा
-डाळ, केळी अशा फायबरयुक्त फूड्सचे सेवन करा
-दररोज एक्सरसाइज करा
-पुरेशी झोप घ्या


आणखी वाचा :
बडीशेपचे ‘हे’ फायदे ऐकाल तर व्हाल चकित
शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर होईल कमी, प्या हे होममेड ड्रिंक

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...