Home आरोग्य दिवाळीत पाहुण्यांच्या हेल्थची अशी घ्या काळजी
आरोग्य

दिवाळीत पाहुण्यांच्या हेल्थची अशी घ्या काळजी

10
health care tips
health care tips

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणाच्या वेळी घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ आणि स्नॅक्स तयार केले जातात. अशातच घरी पाहुण्यांची ये-जा असते. खासकरून दिवाळीच्या वेळी आपण आपले शेजारी किंवा नातेवाईकांना सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातो आणि तेव्हा विविध पदार्थ खाण्याची मजा घेतो. काही लोक सणासुदीला हेल्थचा विचार न करता काहीही खातात. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी सारखी समस्या होते. (Health Care Tips)

तब्येत बिघडल्याच्या कारणास्तव आपण सणाची मजा घेऊ शकत नाही. त्यामुळे हे गरजेचे आहे की, दिवाळीच्या काळात ही आरोग्याची काळजी घेत हेल्दी फूड्स खाल्ले पाहिजेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा हेल्दी फूड्स खायला दिले पाहिजेत. तर जाणून घेऊयात दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याच बद्दलच्या काही टिप्स.

घरीच बनवा पदार्थ
दिवाळीदरम्यान लोक घरातील कामांमध्ये फार व्यस्त असतात.अन्य तयारी ते करत असल्याने पाहुण्यांसाठी फारसा वेळ काही बनवण्यासाठी राहत नाही. हेच कारण आहे की, बहुतांश लोक पाहुण्यांसाठी बाहेरून फूड ऑर्डर करतात. घरीच पदार्थ बनवण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण आरोग्य बिघडणार नाही. सणासुदीला बाहेरचे फूड्स अजिबात हाइजेनिक नसते.

हेल्दी फूड्स आणि आरोग्याची काळजी
बाहेरून ऑर्डर केलेल्या फूड्समध्ये अधिक प्रमाणात तेल आणि मसाले असतात.परंतु असे पदार्थ पाहुण्यांनी खाल्ल्यास अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे पाहुण्यांना सणासुदीच्या काळात घरीच तयार केलेले हेल्दी फूड्स खाण्यास द्या.

बदलत्या वातावरणाची घ्या काळजी
दिवाळी आल्यानंतर बदलत्या वातावरणाची काळजी घ्यावी. या वेळी थंडी सुरु होते. यामुळे खाण्यापिण्याची निवड करताना सावधगिरी बाळगावी. मेन्यूमध्ये अधिक थंड आणि डिप फ्राइड पदार्थांचा समावेश करू नये. यामुळे घसा बिघडू शकतो. त्याचसोबत घरी हाइजीनची काळजी घ्यावी. (Health Care Tips)

स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
दिवाळी सेलिब्रेशन दरम्यान काही प्रकारच्या वस्तूंना आपण स्पर्श करतो. त्यामुळे आपले हात खराब होतात. त्याच हाताने आपण बहुतांशवेळा जेवण वाढते.असे केल्याने हाताला लागलेले बॅक्टेरिया पदार्थाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. म्हणून दिवाळीच्या वेळी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.


हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...