Home लाईफ स्टाईल एंग्जायटी आणि डिप्रेशनच्या समस्येपासून असे रहा दूर
लाईफ स्टाईल

एंग्जायटी आणि डिप्रेशनच्या समस्येपासून असे रहा दूर

8
Depression in Winter
Depression in Winter

Health Care Tips : सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि मॉर्डन कल्चरमुशे आपले आयुष्य अगदी सोपे झाले आहे. पण नातेसंबंध बिघडले जात असल्याचे दुसऱ्या बाजूला दिसून येत आहे. याआधी व्यक्ती एकमेकांना भेटणे पसंत करायचे. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होतात. अथवा कोणलाही एकमेकांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशातच व्यक्ती स्वत:ला कधीकधी समाजात आपण एकटे असल्याचे समजतो. यामुळे मानसिक आरोग्यही बिघडले जाते. याचा एकूणच परिणाम आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर देखील होते. अशातच डिप्रेशन आणि एंग्जायटीची समस्या उद्भवू शकते.

एंग्जायटी आणि डिप्रेशन
नोकरी किंवा नातेसंबंधात तणाव, परिक्षेच्या अभ्यासाचे टेन्शन किंवा भावना वारंवार दुखावल्या जात असतील तर मानसिक आरोग्य बिघडले जाऊ शकते. यामुळे डिप्रेशनच्या स्थितीत व्यक्ती जाऊ शकतो. यावर एकच उपाय म्हणजे स्थिती समजून घेणे, स्विकार करणे आणि मदत घेणे. जाणून घेऊया डिप्रेशन आणि एंग्जायटीच्या समस्येपासून कसे दूर रहावे याबद्दल सविस्तर…

Mental health care tips
Social anxiety reasons

लक्षणे काय?
चिंता आणि डिप्रेशनची काही कारणे आहेत. जसे की, सतत भीती वाटत राहणे, वारंवार एखाद्या गोष्टीची चिंता वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, लक्ष केंद्रित करण्यावर समस्या, झोप येणे किंवा उदास राहणे अशी काही लक्षणे व्यक्तीमध्ये दिसू शकतात.(Health Care Tips)

=======================================================================================================

हेही वाचा : 

तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित

मुलांचे अभ्यासात मनं लागत नसल्यास वापरा या टिप्स

=======================================================================================================

उपाय काय?
-स्वत:ला समजून घ्या आणि प्रत्येक भावना स्विकार करुन त्यावर मार्ग काढा.
-दररोज वेळेवर उठणे, खाणे आणि झोपणे याचे टाइमटेबल तयार करा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईळ.
-योगाभ्यास, प्राणायम आणि मेडिटेशन करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि तणाव कमी होईल.
-नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यावेळी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
-जवळच्या व्यक्तींसोबत बोला. यामुळे मनं हलके होईल.
-एक्सरसाइज करा. यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन रिलीज होतात. अशातच एंग्जायटी आणि डिप्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता.
-दररोज पुरेशी झोप घ्या.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....