Home आरोग्य हिवाळ्यात ‘या’ गोष्टींचे करा सेवन, रहाल आजारपणापासून दूर
आरोग्य

हिवाळ्यात ‘या’ गोष्टींचे करा सेवन, रहाल आजारपणापासून दूर

8
Health Care in Winter
Health Care in Winter

हिवाळ्याच्या दिवसात उठणे-बसणे मुश्किल होते. या दिवसांमध्ये फक्त झोपून रहावेसे वाटते. थंडीच्या वातावरणामुळे काही आजार वाढण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचसोबत शरिर थंड होण्यासह आजर पटकन होऊ शकतात. यासाठी त्या दिवसांमध्ये खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा समस्या येऊ शकते. जर थंडीत तंदुरस्त रहायचे असेल तर शरिरात उर्जा हवीच. त्यासाठी आपण खाण्यामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्या शरिराला आतमधून गरम ठेवतील. तर जाणून घेऊयात हिवाळ्यात अशा कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत ज्या आपल्याला आजारपणापासून दूर ठेवतील. (Health Care in Winter)

-गुळ
गुळ आरोग्यासाठी फायदेशीर असतो. खासकरुन थंडीच्या दिवसात गुळ खाल्ल्याने फायदा होतो. गुड हा गरम असल्याने त्याचे तु्म्ही हिवाळ्यात लाडू किंवा मिठाई सुद्धा खाऊ शकतात. या व्यतिरिक्त चहात साखरेऐवजी गुळ ही टाकू शकता.

-मध
मधात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळेच मध ही गरम मानले जाते. मध खाल्ल्याने शरिरातील थंडावा दूर होतो. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्याचे काम करते. अशा प्रकारे मधाचे सेवन केल्याने आजारपणाशी लढण्याची शक्ती ही मिळते. दररोज एक चमचा गरम मधाचे सेवन केल्यास सर्दी, खोकल्यासारखे आजार दूर राहू शकतात.

Health Care in Winter
Health Care in Winter

-आलं
आल्यात खुप औषधी गुण असतात. थंडीच्या दिवसात आल्याची चहा प्यायल्यानंतर शरिराला उर्जा मिळते. कारण यामध्ये काही न्युट्रीएंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आल्यात अँन्टीऑक्सिडेंट आणि अँन्टी-इंफ्लामेटरी गुण असतात. आलं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

-सूप
थंडीच्या दिवसात गरम गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. जर तुम्ही भजी ऐवजी सूप सारखे पदार्थ नाश्तात समावेश करत असाल तर उत्तम ठरेल. भाज्यांपासून बनवण्यात आलेले सूप प्यायल्याने आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरु शकते. सूप हाडांना मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचसोबत मसल्सला सुद्धा अॅक्टिव्ह ठेवतात. (Health Care in Winter)

हे देखील वाचा- थंडाव्यात मेथीच्या लाडवाची गोडी….

-अंडी
अंड्यात प्रोटीन सारखी पोषक तत्व भरपूर असतात. अंडी खाल्ल्याने थंडी दूर होते. थंडीच्या दिवसात उकडलेले अंडे खाणे फायदेशीर असते. अंड्यात असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

त्याचसोबत थंडीच्या दिवसात नव्हे तर इतर वेळी सुद्धा झोपण्यापूर्वी कमीत कमी ४ तास आधी भोजन करावे. जेणेकरुन त्याचे पाचन उत्तम प्रकारे होते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हळद, खारीक आणि आल घातलेले दूधाचे सेवन करुन पहा. त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...