Home आरोग्य जान्हवी कपूर ते मलाइका अरोडा दररोज करतात तूपाचे सेवन, रहाल फिट आणि हेल्दी
आरोग्य

जान्हवी कपूर ते मलाइका अरोडा दररोज करतात तूपाचे सेवन, रहाल फिट आणि हेल्दी

7
foods avoid with ghee
foods avoid with ghee

Health Care : जर तुम्ही वजन वाढेल म्हणून तूपाचे सेवन करत नाही. तूपामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ए सारखी पोषण तत्त्वे असतात. जे आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर अभिनेत्रींच्या काही मुलाखतीमध्ये देखील त्यांनी दररोज तूपाचे सेवन करत असल्याचे सांगितले आहे. शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, मलाइका अरोडा, करिना कपूर, कृती सेनन अशा अभिनेत्री दररोज तूपाचे सेवन करतात.

कधी आणि किती तूपाचे सेवन करावे
तुम्हाला पचनासंबंधित समस्या असल्यास दररोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगसारख्या समस्या दूर राहू शकतात. याशिवाय गरम डाळ किंवा भाजीमध्ये तूप टाकीन खाऊ शकता. दररोज तीन ते सहा चमचे तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

वजन कमी होण्यास फायदेशीर
सर्वसामान्यपणे काहींना वाटते की, तूपाचे सेवन केल्याने वजन वाढले जाईल. खरंतर, तूपाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तूपामध्ये फॅट कमी करणारे ब्युरेटिक अॅसिड असतात. यामुळे मर्यादित प्रमाणातच तूपाचे सेवन करावे.

पचनासंबंधित समस्यांपासून सुटका
तुम्हाला पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास पचनासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. दररोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तूपाचे सेवन करावे. यामुळे गट हेल्थ सुधारले जाऊ शकते.

केसांसाठी फायदेशीर
दररोज तूपाचे सेवन केल्याने केसांवर सकारात्मक प्रभाव पडतो. तूपाचे सेवन केल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. तूपात फॅटी अॅसिड नैसर्गिक पद्धतीने केसांना कंडिशनिंग करतात. उपाशी पोटी तूपाचे सेवन केल्याने केस गळतीची समस्याही कमी होऊ शकते. (Health Care)

त्वचेसाठी फायदेशीर
अँटी-एजिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तूपाचे सेवन करू शकता. त्वचेसाठी महत्त्वाचे असणारे फॅटी अॅसिड तूपात असतात. दररोज तूपाचे सेवन केल्याने त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही तूपाचे डाएटमध्ये सेवन करू शकता.


आणखी वाचा :
सकाळ ते संध्याकाळपर्यंत या 4 हेल्दी सवयी अंगी बाळगा, आजारपणापासून रहाल दूर
बर्ड फ्लू मुळे जगात पहिल्यांदाच व्यक्तीचा मृत्यू, दिसून येतात ही लक्षणे

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...