Home गाजावाजा स्पेशल ‘या’ 3 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बिघडू शकते पोट
गाजावाजा स्पेशल

‘या’ 3 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बिघडू शकते पोट

9
Health Care Advice
Health Care Advice

Health Care Advice :  बिघडलेली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याची अयोग्य सवय यामुळे गट हेल्थवर परिणाम होतो. अशातच पचनक्रिया आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, दररोज एक्सरसाइज न केल्यानेही पचनक्रिया बिघडली जाते. यामागील एक कारण म्हणजे शरिरातील व्हिटॅमिनचा स्तर कमी होणे.

खरंतर, गट हेल्थ दुरुस्त राहण्यासाठी व्हिटॅमिन योग्य प्रमाणात शरिराला मिळणे अत्यावश्यक आहे. अशातच जाणून घेऊया अशा काही व्हिटॅमिन बद्दल जे आतड्यांना हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन बी12
शरिरासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या व्हिटॅमिनपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी12 चा समावेश आहे. याच्या कमतरतेमुळे एकूणच आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून येते. व्हिटॅमिन बी12 आपल्या गट हेल्थसाठी गरजेचे असून माइक्रोबायोम वाढवण्याचे काम करते. याच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. अशातच डाएटमध्ये डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश करावा.

व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तुम्हाला पचनासंबंधित समस्या असल्यास डाएटमध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश करावा. यामुळे शरिरात कोलेजन तयार होण्यास मदत होते. याशिवाय आपल्या शरिरातील आतड्या हेल्दी होण्यासही मदत होते. यासाठी लिंबू, संत्र अशा फळांचा डाएटमध्ये समावेश करू शकता. (Health Care Advice)

व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी आपल्या हाडांसाठी फार महत्त्वाचे असते. याशिवाय पचनक्रियेसाठीही व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरते. याच्या कमतरतेमुळे पचनक्रिया बिघडली जाते. शरिरात व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी सुर्यप्रकाशाची मदत घेऊ शकता. दररोज सकाळी 20 मिनिटांपर्यंत उन्हात बसल्यास शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होऊ शकते. तसेच पचनक्रियाही सुधारली जाऊ शकते.


आणखी वाचा :
जान्हवी कपूर ते मलाइका अरोडा दररोज करतात तूपाचे सेवन, रहाल फिट आणि हेल्दी
सकाळ ते संध्याकाळपर्यंत या 4 हेल्दी सवयी अंगी बाळगा, आजारपणापासून रहाल दूर

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....