भगवान श्रीरामांचे परमभक्त असलेल्या हनुमानांची शक्ती किती आहे, याचा परिचय सर्वांनाच आहे. द्रोणागिरी पर्वताला उचलणा-या हनुमानांची शक्तीची देवता म्हणून पूजा केली जाते. याच शक्तीमान हनुमानाला कोणी बेड्यांमध्ये बंदिस्त ठेऊ शकेल का. पण असे बेड्या घातलेल्या हनुमानांचे मंदिर भारतात लोकप्रिय आहे. हे मंदिर आहे, ओडिशा येथील पुरीमध्ये भगवान जगन्नाथांच्या मंदिरामागे. या मंदिरातील हनुमान हे जगन्नाथ मंदिराचे रक्षक म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्ष भगवान जगन्नाथांनीच त्यांना बेड्या ठोकल्या असल्याची कथा आहे. शिवाय भगवान जगन्नाथांच्या मंदिरावरील ध्वजही नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. त्यामागेही त्यांचे रक्षक असलेल्या हनुमानांची शक्ती असल्याही कथा आहे. समुद्र किना-याजवळ असलेल्या या मंदिराला दरिया मंदिर म्हणूनही ओळखले जाते. पुरातन मंदिर म्हणून या बेडी हुनामानांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. भगवान जगन्नाथांचे दर्शन झाल्यावर बेडी हनुमानाचे दर्शन घेण्याची प्रथा या भागात आहे. (Jagannath Temple)

भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेसाठी अवघं पुरी शहर भाविकांनी गजबजून गेलं आहे. सर्व भाविकांच्या नजरा रथयात्रेतील भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झाल्या आहेत. अशावेळी हे भक्त आणखी एका मंदिरात मोठ्या संख्येनं गर्दी करीत आहेत. हे मंदिर आहे, रामभक्त हनुमान यांचे. या मंदिराला बेडी हनुमान मंदिर म्हटले जाते. कारण येथील हनुमानाजींना बेड्या घातल्या आहेत. भारतात अनेक अद्वितीय मंदिरे आहेत, त्यातीलच हे एक मंदिर आहे. या मंदिरात महाबली हनुमानजी साखळदंडांनी बांधलेले आहेत. या सर्वांमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान जगन्नाथांचे हे मंदिर राजा इंद्रद्युम्नने बांधले. मात्र समुद्रकिना-यावर हे मंदिर बांधतांना राजाला अनेकवेळा समुद्राच्या लाटांचा अडथळा आला. (Social News)
काहीवेळा बांधेलेले मंदिरही समुद्राच्या पोटात सामावून गेले आहे. अशावेळी राजा इंद्रद्युम्नने हनुमानांना प्रार्थना केली. राजानं या मंदिराचे रक्षण करण्याची जबाबदारी हनुमानांना दिली. तेव्हापासून समुद्र मंदिरापासून काही अंतर दूर गेला आणि मंदिराची उभारणी करण्यात आली. पुरीचे जगन्नाथ धाम हे चार धामांपैकी एक आहे. येथे स्वतः भगवान श्री जगन्नाथ स्वतः त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह राहतात. या मंदिरातील भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी हनुमान अनेकवेळा आपले स्थान सोडून मंदिरात येत असत. अशावेळी समुद्रदेवही श्री जगन्नाथजींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करत असत. यामुळे मंदिराचे वारंवार नुकसान होऊ लागले. म्हणून, महाप्रभु जगन्नाथजींनी समुद्रापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी हमुमानला एकाच जागी थांबण्याचा आदेश दिला. हनुमानजींना एकाच जागी रोखण्यासाठी त्यांना प्रभू जगन्नाथांनी सोन्याच्या बेड्या बांधल्या. (Jagannath Temple)

तेव्हापासून जगन्नाथपुरी येथील समुद्रकिना-यावरील मंदिर बेडी हनुमान मंदिर किंवा बेदी हनुमान मंदिर म्हणून ओळखळे जाऊ लागले. हातात बेड्या असल्या तरी हनुमान या मंदिराभोवती सतत फे-या मारत असतात. त्यांचा वेग हा वायुपेक्षा अधिक असतो. सतत ते मंदिराभोवती फे-या मारतात, त्यांच्या या वेगामुळेच जगन्नाथ मंदिरावरील ध्वजही वा-याच्या विरुद्ध दिशेला फडकत असल्याचे सांगितले जाते. पुरातन अशा बेडी हनुमान मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देवी-देवतांची चित्रे आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर गणपतीची मूर्ती आहे. पश्चिमेकडील भिंतीवर अंजनामातेची प्रतिमा आहे तर उत्तरेकडील भिंतीवर विविध देवींच्या प्रतिमा आहेत. हे मंदिरही राजा इंद्रद्युम्नने बांधल्याची माहिती असून जगन्नाथ मंदिराएवढेच हे मंदिरही पुरातन असल्याची माहिती आहे. मंदिरात हनुमानांची मुर्तीही मोठी असून या मुर्तीचे डोळेही भगवान जगन्नाथांच्या डोळ्यांसारखे मोठे आहेत. (Social News)
=============
हे ही वाचा : Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !
============
या मंदिरात तीन उत्सव साजरे केले जातात. भगावन जगन्नाथांच्या रथउत्सवाच्या काळात या बेडी हनुमान मंदिरातही उत्सव होतो. भगवान जगन्नाथ नगरभ्रमण करतात, तेव्हा येथे हनुमानांच्या नामाचा जप केला जातो. हजारो भाविक यावेळी हजर असतात. शिवाय हनुमान जयंतीही येथे अनोख्या पद्धतीनं साजरी होते. हनुमानजींना सिंदूर लेपन करण्यात येते. हजारो भाविक येथे हनुमान चालीसा पठण करतात. मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. याशिवाय या मंदिरात रामनवमीचा उत्सवही साजरा केला जातो. भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक या मंदिरात आवर्जून जातात आणि हनुमनानांचे दर्शन घेत आभार व्यक्त करतात. (Jagannath Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- bedi hanuman mandir
- BJP
- china
- congress
- cricket
- donald trump
- Dronagiri
- eknath shinde
- Entertainment
- Hanuman
- hanuman mandir
- india
- information
- International news
- Jagannath Temple
- jagganath mandir history
- jagganath mandir information
- jagganath mandir mystery
- jagganath mandir rathayatra
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Lord Jagannath Temple
- Maharashtra
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण