Home लाईफ स्टाईल केसांना चमक येण्यासाठी करा हे उपाय
लाईफ स्टाईल

केसांना चमक येण्यासाठी करा हे उपाय

8
Hair Care

Hair Care Tips : प्रत्येक महिलेचे स्वप्न असते की, लांब-घनदाट केस हवेत. पण सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात केसांची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे असते. अन्यथा केसांची चमक दूर होते. केसांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट किंवा प्रोडक्ट्सही वापरले जातात. पण तरीही केसांचे आरोग्य राखले जात नाही. अशातच केसांची चमक दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकता याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

ऑलिव्ह ऑइलचा वापर
ऑलिव्ह ऑइलमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे केसांना ऑलिव्ह ऑइल हाइड्रेट आणि डीप कंडीशनरच्या प्रमाणे काम करते. याशिवाय ऑलिव्ह ऑइलच्या तेलाचा वापर केसांसाठी केल्याने केसांसंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय केसांना चमकही येते.

Hair Care Tips
Hair Care Tips

असा करा वापर
-एका वाटीत ऑलिव्ह ऑइल घ्या
-यानंतर तेल मंद आचेवर गरम करा
-हलक्या हाताने केसांच्या मूळांना 10 मिनिटे मसाज करा
-केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या
-हा उपाय आठवड्यातून 2 करू शकता

एलोवेरा जेलचा वापर करा
एलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरस आणि अँटीसेप्टिक गुण आहेत. हे सगळे गुण केसांसाठी फायदेशीर ठरले जातात. या गुणांमुळे केसांची चमक वाढण्यास मदत होऊ शकते. एलोवेरा जेलसोबत मधाचा वापर करू शकता.

असा करा वापर
– एका वाटीत एलोवेरा जेल आणि मध मिक्स करुन घ्या
-मिश्रण केसांना लावून ठेवा
-20 मिनिटे मसाज करा नंतर केस स्वच्छ धुवा
-हा उपाय आठवड्यातून 2 करू शकता (Hair Care Tips)

=======================================================================================================

हेही वाचा : 

ब्यूटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, खुलेल सौंदर्य

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा असा करा वापर

=======================================================================================================

या गोष्टी लक्षात ठेवा
– आठवड्यातून 2 वेळा केसांना तेलाने मसाज करा
– केसांसाठी योग्य शॅम्पू आणि कंडीशनरचे स्वच्छ धुवा
– आठवड्यातून दोनदा नॅच्युरल हेअर मास्क लावू शकता

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....