Home लाईफ स्टाईल पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?
लाईफ स्टाईल

पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?

11
Hair Care

Hair Care in Monsoon : पावसाळा सुरू होताच वातावरणातील ओलावा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो. अनेकांना या ऋतूमध्ये केस कोरडे होण्याची समस्या उद्भवली जाते. यासाठी योग्य पोषण देणारे हेअर मास्क वापरणे अत्यंत गरजेचे असते. नैसर्गिक आणि घरच्या घरी बनवता येणारे हे मास्क केसांना पोषण देतात आणि त्यांना सतेज बनवतात. चला तर पाहूया, पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क उपयुक्त ठरतात.

केळी आणि मधाचा हेअर मास्क

केळी ही नैसर्गिकरीत्या केसांना मॉइश्चर देणारी फल आहे. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात. केळी आणि मध एकत्र केल्यास केसांना पोषण मिळते, कोरडेपणा दूर होतो आणि केस मऊसर होतात.
कसा वापरावा: एक पक्की केळी मॅश करून त्यात दोन चमचे मध मिसळा. हे मिश्रण केसांवर लावा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर सौम्य शँपूने धुवा.

Homemade Hair Mask
Hair Care in Monsoon

दही आणि मेथी मास्क

दहीमध्ये नैसर्गिक फॅट्स असतात जे केसांना आर्द्रता देतात, तर मेथी कोरडेपणा, कोंडा आणि केस गळतीवर उपयोगी आहे.
कसा वापरावा: दोन चमचे मेथी रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पेस्ट तयार करून त्यात अर्धा वाटी दही मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि एक तास ठेवा. मग केस धुवा.

खोबरेल तेल आणि एलोवेरा मास्क

खोबरेल तेल हे पारंपरिक उपाय असून एलोवेरा जेल केसांना डीप कंडीशनिंग करते. हे दोन्ही घटक एकत्र केल्यास कोरड्या केसांसाठी हे सर्वोत्तम नैसर्गिक उपाय ठरतो.
कसा वापरावा: २ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे एलोवेरा जेल एकत्र करून मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा, विशेषतः टोकांवर. ४० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.(Hair Care Tip)

अंडी आणि ऑलिव्ह ऑइल मास्क

अंड्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे केसांना मजबुती देते. ऑलिव्ह ऑइल हे नैसर्गिक कंडिशनर असून केस मऊ आणि चमकदार बनवते.
कसा वापरावा: एक अंडं फोडून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. मिश्रण एकजीव करून केसांवर लावा. ३० मिनिटांनी सौम्य शँपूने धुवा.(Latest Marathi News)

=============

हे ही वाचा :

केसांच्या तेलकट मूळांमुळे होऊ शकते केसगळती, वाचा कारणे आणि उपाय

करण जोहरच्या वेट लॉस जर्नीचे सीक्रेट, घ्या जाणून

=============

दूध आणि मध मास्क

दूधात लॅक्टिक अ‍ॅसिड असते जे मृत पेशी दूर करते आणि केसांच्या मुळांना पोषण देते. मध याला अतिरिक्त हायड्रेशन देतो.
कसा वापरावा: अर्धा कप दूधात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण केसांवर फवारा किंवा हाताने लावा. २०-२५ मिनिटांनी धुवा.(Hair Care in Monsoon)

महत्त्वाचे टिप्स:

  • हे मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरल्यास चांगला फरक दिसून येईल.
  • केस धुण्यासाठी गरम पाणी टाळा. कोमट किंवा थंड पाणी वापरा.
  • नैसर्गिक घटकांना वेळ लागतो, त्यामुळे नियमित वापर आवश्यक आहे.
  • केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरणे विसरू नका.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....