Home व्यक्ती विशेष घरातून फक्त ४०० रुपये घेऊन निघाले होते गुजरामल मोदी, जाणून घ्या मोदी शहराचा इतिहास
व्यक्ती विशेष

घरातून फक्त ४०० रुपये घेऊन निघाले होते गुजरामल मोदी, जाणून घ्या मोदी शहराचा इतिहास

12
Gujarmal Modi
Gujarmal Modi

गाजियाबाद जवळ असलेले औद्योगिक शहर हे प्रत्येकालाच माहिती आहे. परंतु हे शहर वसण्यामागे एक कहाणी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मिस युनिव्हर्स सुस्मिता सेन हिच्या संबंधासंदर्भात चर्चेत आलेले माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांचे आजोबा गुजरमल मोदी यांनी हे औद्योगिक शहर वसवले होते. तर जेव्हा गुजरमल मोदी (Gujarmal Modi) हे घरातून फक्त ४०० रुपये निघाले होते पण आज त्यांनी मोठ्या उद्योगधंद्याचे साम्राज्य उभे केले आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल अधिक.

राम प्रसाद असे झाले गुजरमल
९ ऑगस्ट १९०२ मध्ये जन्मलेले गुजरमल मोदी यांचे लहानपणीचे नाव राम प्रसाद होते. त्यांचे पालनपोषण त्यांची दाई मा गुजरी देवी यांनी केले होते. वडील मुल्तानी मल यांचे काही विवाह झाले होते. परंतु दाई मा सोबतचे त्यांचे नाते ऐवढे अतुट होते की, त्यांचे नाव सुद्धा गुजरमल असे पडले. कमी वयातच उद्योगधंद्याच्या जगात पाऊल ठेवलणारे गुजरमल मोदी यांना इंग्रजांनी रायबहादुर यांची उपाथी दिली होती. त्यांनी फक्त ४०० रुपये घेऊन घरातून निघाले होते खरे पण आपल्या मेहनतीने एक औद्योगिक शहर वसवले आणि त्याला मोदी नगर असे नाव मिळाले.

वयाच्या १७ व्या वर्षात सुरु केला व्यावसाय
राय बहादुर सेठ यांचे गुजरमल मोदी हरियाणा यांच्याशी संबंध होते. त्यांनी केवळ १७ व्या वर्षातच व्यापाराच्या जगात पाऊल ठेवले. १९१९ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबत घरासंबंधित उद्योग करत होते, परंतु त्यांचे नशीब त्यांना आणखी पुढे घेऊन जाणारे होते. जेव्हा खिशात फक्त ४०० रुपये घेऊन निघालेले गुजरमल मोदी यांनी वनस्पती घी चे काम करु लागले होते.

Gujarmal Modi
Gujarmal Modi

असे पालटले नशीब
गुजरमल मोदी यांचे नशीब अशावेळी पालटले जेल्हा त्यांनी दिल्लीपासून जवळजवळ ५० किमी दूर बेगमाबाद परिसरात १०० एकर जमीन खरेदी केली. ते वर्ष १९३३ चे होते, इंग्लंड मधून आयात केलेल्या मशीनींसोबत त्यांनी या परिसरात एक साखर कारखाना सुरु केला. बेगमबाद मधील हा परिसर आजच्या काळात गाजियाबाद मधील मोदी नगर नावाने ओळखले जाते.

साबण, टॉर्च आणि लालबत्तीचा उद्योग
साखरेच्या कारखान्यात यश मिळाल्यानंतर गुजरमल यांनी १९३९ मध्ये आपल्या पूर्वीच्या उद्योगाकडे वळले. ते वनस्पती घी-तेलाचे काम करु लागले. त्यानंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण लक्ष हे उद्योग वाढवण्याकडे दिले. गुजरमल मोदी (Gujarmal Modi) यांना १९४१ मध्ये आणखी एक मोठे यश मिळाले. जेव्हा त्यांनी वनस्पतीच्या मदतीने साबण तयार करण्याचे काम सुरु केले. त्यानंतर मिळत गेलेल्या यशाच्या प्रवासात त्यांनी तेल, कापड, रंग आणि वार्निश, ग्लिसरीन, लाल बत्ती, बिस्किट, टॉर्च, रबर, स्टील, रेशम सारखे उद्योग केले.

हे देखील वाचा- तब्बल ९० वर्ष भारतावर राणी व्हिक्टोरियाने ठेवले होते आपले वर्चस्व

मोदी समूहाची झाली सुरुवात
१९४२ मध्ये उद्योगधंद्यातील योगदान आणि मोदीनगर सारखे शानदार शहर वसवल्याने त्यांना ब्रिटिश हुकूमत यांनी राय बहादुर ही उपाधी दिली. त्यानंतर १९६३ पर्यंत गुजरमल मोदी यांच्या उद्योगधंद्याची विरासत मोदी ग्रुपमध्ये बदलली गेली. त्यांना भारत सरकारने १९६८ मध्ये पद्म भुषणने गौरवले.

आता मोदी ग्रुप Marloro, Four Square आणि Red & White सारख्या सिगरेट तयार कराता. पान विलास ब्रँन्डचा पान मसाला होण्यासह ग्रुप रिटेल सेक्टरमध्ये सुद्धा काम करतो. देभरात या ग्रुपचे 24×7 नावाने सर्व प्रकारचे स्टोर चालविले जातात. त्याचसोबत कन्फेक्शनरी सेक्टरमध्ये सुद्धा ते काम करतात. (Gujarmal Modi)

मोदी परिवारात पडली फुट
मोदी ग्रुप, भारतातील त्या पहिल्या उद्योगधंद्यातील परिवारामधील एक आहे जेथे पारिवारात फुट, वाटे झाल्याचा परिणाम त्यांच्या ग्रुपच्या कंपन्यांना सहन करावा लागला. ८० च्या दशकाच्या मध्यात मोदी ग्रुपचा उद्योग हा गुजरमल मोदी आणि त्यांचा भाऊ केदार नाथ मोदी यांच्यामध्ये विभागला गेला. त्यानंतर गुजरमल मोदी यांचा उद्योग हा त्यांचा मुलगा के.के. मोदी याने सांभाळला. तर ललित मोदी, के.के मोदी यांचाच मोठा मुलगा आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...